Showing posts with label All. Show all posts
Showing posts with label All. Show all posts

Tuesday, February 25, 2014

आवडायचं मला……

मैत्रिणींच्या घोळक्या मधुनी….
ते लपून…. डोळे भरून बघणं, तुझं!!!
आवडायचं  मला……

अभ्यास करताना नकळत…
वही वर लिहिल्या गेलेलं माझा नाव!!!
आवडायचं मला……

बाष्कळ विनोदावर ही माझ्या……
तू एकटीनेच खूप हसलेलं!!!
आवडायचं मला…

तुझ्या वरून तुझ्या नकळत……
मित्रांनी जाम चिडवलेलं!!!!
आवडायचं मला……

वर्गात शिरल्या-शिरल्या……
मला शोधणारी ती नजर तुझी!!!!
आवडायची मला……

माझ्या सोबत घरी परतायचं म्हणून…
तुझं उगाच वाट बघत रेंगाळणं!!!!
आवडायचं मला………

एकत्र अभ्यास करताना……
अचानक पणे लाजणं तुझ!!!
आवडायचं मला……

खेळात हरल्यामुळे हिरमुसल्या मनाला…
न बोलता ही समजावणं तुझ!!!
आवडायचं मला…….

परीक्षेला स्वतः घाबरून ही……
मला धीर देणं तुझं!!!
आवडायचं मला…….

निरोप घेऊन निघाल्यावर…
खोट्या कारणांमुळे मागे फिरणं!!!
आवडायचं मला…….

प्रेम डोळ्यात स्पष्ट असताना ही……
ओठान मागे लपवण्याची धडपड!!!
आवडायची मला……

सोडून जाताना ही ते…….
हुंदके देत "काळजी घे" म्हणणं ही!!!!
आवडलं मला……

सगळच कसं तुझं अजूनही
आवडत मला!!!!
सगळच कसं तुझं अजूनही
आवडत मला!!!!


Tuesday, February 18, 2014

तुझ्या विना.....


नको तुझा हाथ हाती….
कशाला हवी ती तुझी साथ!!!
नको तुझी ती काही क्षणांची सोबत….
छळणारे मागे तुझे आभास!!!!

नको तुझ्या नजरेची गुंफण….
अन जखडून थेवणारे लाजरे भाव!!!!
नको तुझ्या स्वप्नांचे सोहळे…
अन ते साजरे ही एकट्याने करणे !!!

नको आता तुझ्या केसांची सावली….
माझे रण-रणते ऊन च बरे!!!!
तुझ्या रिकाम्या, उबदार मिठी पेक्षा…
माझ्या सोबतीचे बोचरे वारेच बरे!!!!!

नको हसू वाढवू माझे….
नकोच पुसू तू अश्रू वाहणारे !!!
नको बघू त्या जखमा दिलेल्या ….
तुझ्या मल्म्हानेच त्या आता जिवंत झाल्या!!!

बंद केली आता कवाडे मनाची
उघडी होती ती तुझ्याच साठी…
रिकामी राहील जरी सदैव आता…
तुझला त्यात आता प्रवेश नाही!!!!

शिकेन पुन्हा मी सावरायला एकटेच 
शिकेन पुन्हा मी लढायला एकटेच
तुझ्या विना इथून पुढे….
शिकेन मी जगायला एकटेच!!!!

तुझ्या विना इथून पुढे….
शिकेन मी जगायला एकटेच!!!!

Monday, February 10, 2014

..... क्यों की तुम ही हो!!!!!!

जीवन में नहीं मगर जीवन के मायने हो तुम.…
सुकून में नहीं  मगर संघर्ष में हो तुम.. 
हर पल में नहीं मगर तन्हाईयों में हो तुम.…
मुस्कराहट में नहीं मगर हर आंसू में हो तुम!!!!!

नतीजो में नहीं मगर उनके इम्तिहानो में हो तुम…
कामयाबी में नहीं मगर असफलताओं में हो तुम
हौसलों में नहीं मगर कमजोरियों में हो तुम..... 
मंज़िल तो नहीं मगर वीरानी राहों में हो तुम!!!!

निश्चय में नहीं मगर समझौतो में हो तुम.…
वादों, कसमों में नहीं मगर उनके टूटने में हो तूम
बातों में नहीं मगर जेहेन में हो तुम.… 
पास हो कर भी मगर खली-पन के एहसास में हो तुम!!!!!

सावन कि रिमझिम में नहीं मगर उसके प्यास में हो तुम.....
निवालों में नहीं मगर उनकी भूक में हो तुम!!!!
वादियों के गूंजने में नहीं मगर दिल चीरते सन्नाटों में हो तुम.....
जलते दीपक में नहीं मगर अंधकार में हो तुम!!!!!

मेरे वर्तमान में नहीं मगर कतरा-कतरा सुलगती यादों में हो तुम.…
नींदों में नहीं मगर खुली आँखों के सपनो में हो तुम
शराब के प्यालो में नहीं मगर चढ़ते नशे में हो तुम.....
पहेली किरन में नहीं मगर डूबते सूरज में हो तुम!!!!!

इबादत में नहीं मगर मेरे रब में हो तुम.…
सिर्फ जेहेन में नहीं मगर रूह में बसे हो तुम!!!!!
सिर्फ जेहेन में नहीं मगर रूह में बसे हो तुम!!!!!


Wednesday, August 28, 2013

झुक-झुक गाडी ते Train

आग-गाडी किंवा रेल्वे शी नाळ जन्म झाल्या झाल्या जोडल्या गेली, म्हणजे आई शी जोडलेली डॉक्टर ने कापली आणि लगेच रेल्वे शी जोडली, म्हंटलं, तरी चालेल. नाही नाही…!!!!!! गाडीत किंवा Train  मध्ये वगेरे जन्माला आलो नाही पण मुंबईत असल्यामुळे, रेल्वे स्टेशन लागून असलेल्या इस्पितळात जन्म झाला. माझी पहिली आरोळी आणि सकाळच्या पहिल्या fast train ची भूपाळी, असे एकत्रित स्वर आई च्या कानी पडले असावेत. तिथे कुठल्या ही गाडी ने जोरात भोंगा वाजवला कि सगळे नवजात शिशु त्याचं प्रतीउत्तर म्हणून भोंगा काढायचे. आता मागे बघता, ते इस्पितळ,कदाचित होणाऱ्या आई ची किंवा बाळाची नाही तर त्या बाळाच्या बापाची सोय बघून च ठरत असे, नाही तर रेल्वे स्टेशनच्या बाजूला Maternity home कोणी का काढावं!!!!!!

असो……
पुढे मग थोडा मोठा झालो, चालता वगेरे यायला लागल्या वर आई ने त्या भोंग्याच्या बोलवीत्या धन्याची म्हणजे खर्या-खुर्या गाडी शी ओळख व्हावी म्हणून स्टेशन वर नेले. बाकी च्या शहरात मुलांना बागेत नेत असतील पण मुंबईतल्या जिजाऊ आपल्या शिवबांना पुढे असलेल्या train मधल्या आपल्या स्वतंत्र जागेच्या लढ्यासाठी तयार करायला स्टेशन वर नेत. मी हि असाच त्या अनेकान पेकी एक. क्रमांक ४ च्या फलाटावरून आई मला विरुध्द दिशे ला "ती बघ तिकडून गाडी येणार……३ नंबर वरून, त्यातून बाबा येणार आपले!!!", असं सांगत होती आणि मी सर्व लक्ष त्या दिशेला केंद्रित केले असताना आमच्या लागून असलेल्या म्हणजे ४ नंबर track वरून एक express मोठ्याने भोंगा वाजवीत गेली आणि मी घाबरून आईच्या दोन पायात डोकं खुपसून रडायला लागलो. आई ने बरच समजावलं कि ती कशी लांब आहे आणि ती platform  वर नाही येत वगेरे वगेरे पण फारसा उपयोग झाला नाही. बाबा आले आणि मी रडतच त्यांचे स्वागत केले आणि नंतर एक cadbury आणि श्रीखंडाच्या गोळ्या कमावून घरी परतलो. काही दिवस मग नियामित पणे स्टेशन वर जात राहिल्या मुळे, गाड्यांशी मैत्री वाढायला लागली. त्यांनी आता मला घाबरवणं सोडलं होतं.

माझ्या काही आवडत्या ठिकाणापेकी, एक ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन !!!!!! मी तासान तास गाड्या बघत बसू शकतो, त्या समुद्राच्या लाटान प्रमाणे एका मागून एक येतच राहतात. प्रत्येक लाट जशी एका समुद्रातून जन्माला आलेली असली, तरी वेगळी, अनोखी, त्याच प्रमाणे त्या गाड्या ही.
ती प्रत्येक लाट स्वतः मध्ये एक स्वंतंत्र सागर घेऊन धावते. सागर… लोकांचा, त्यांच्या भावनांचा, विचारांचा, सुख-दुखांचा, आशा-निराशांचा, अपेक्षांचा!!!!………
या धावत्या विश्वाचा मी कदाचित एकमेव स्थिर, अचल असा श्रोता होतो. ते प्रत्येक धावतं विश्व माझ्या समोर भरायचं आणि रिकामं ही व्हायचं!!!!

एकदा असाच माणसे निरखून कंटाळ आला म्हणून मी गाड्यांना निरखून पाहू लागलो. त्या ही भरपूर काही बोलून जायच्या. माणसांना घेऊन जाता-जाता त्या हि माणसा प्रमाणे हाव-भाव दाखवायला लागल्या होत्या. हे माझं निरक्षण होतं की मी गाड्यांना समजायला लागलो होतो, ते नाही माहित!!!!………

गाड्यांच्या पण तर्हा असतात……… कुठली जलद गाडी किंवा जिला fast train म्हणवं तिला निरखून बघितल्या वर असं लक्षात येतं कि ति वेगळ्या च तोऱ्यात असते, स्वतःच्या गती चा जणू गर्व असतो, भरपूर मोठा आवाज आणि धूळ उडवीत ती स्टेशन वरून न थांबता जाते. तिला बघून, आपण यात असतो तर लवकर पहूचलो असतो अशी दुखी जाणीव तुमच्या चेहर्यावर बघितल्या शिवाय तिला बरं नाही वाटत. ती तिच्या स्वतः कडे तुमचं लक्षं वेधून घेतेच. बघत नसाल तर भोंगा वाजवते!!!!!… लहान मुल कसं रडून तुमचं लक्षं वेधून घेईल अगदी तसं.

तश्या सगळ्याच जलद गाड्या अश्या असतात असं ही नाही. तुम्ही कर्जत किंवा कसाराला जाणऱ्या किंवा येणाऱ्या गाड्या बघीतल्या की त्या एकाद्या खुप कष्ट करून मग सुखाचे दिवस बघत असलेल्या माणसां सारख्या भासतात. कसारा ते कल्याण धीमी गती ने झालेला खडतर प्रवास करून अचानक वाटेतील सगळे ऱ्होडे संपल्या वर माणूस कसा प्रगती शील वेग घेतो तश्या या गाड्या वेग घेतात. त्यांना त्यांच्या या वेगाचा अभिमान नसतो, माज पण नसतो, पण झालेल्या कष्टाची जाणीव असते. त्या मोठ्याने भोंगे वगेरे वाजवीत नाही. अगदी गरज पडली तर "मी जाते आहे" ह्याची फक्त वर्दी देऊन निघून जातात. चुकून तुमच्या स्टेशन वर थांबल्या तर "हुस्स्स्स्स्श्ह" असा श्वास सोडतात. त्यांच्या प्रवासाला त्या स्वतः ही कधी कधी कंटालेल्या आहेत असं  वाटत, कधी-कधी तर लहान मुलाला जबरदस्ती शाळेत ओढत नेत आहे असे आवाज काढतात. कधी तर खरच दमलेल्या हि असतात, "चला, गेलं मुलुंड…आता ठाणे"…… असे जसे काही माणसं दिवस ढकलतात तशी ह्या stations ढकलत पुढे जातात!!!!!!

कधी-कधी देव ही जलद गाड्यांची परीक्षा घेतो, कुठल्या fast train च्या नशिबी कधी slow track ही येतो आणि ती बिचारी धक्के खात-खात, आपल्या बरोबरीच्या गाड्यांना आपल्या पुढे जाताना बघत हळू-हळू सरकत असते. तिचा तो राग, ती तळमळ, वेग न घेता येण्याची विफलता स्टेशन मधून निघताना दिसते किंवा ऐकू ही येते…. यंत्रा चा मोठा आवाज करून वेग घेते कि काय असं दाखवीत, थोडी धुमसून, रागाचे भोंगे वाजवून ती परत हळू होते. तिची ती घुसमट चुकीच्या जागी आणि चुकीच्या परीस्थित सापडेल्या माणसा पेक्षा काही कमी नसते. तिच्या वाटेला आलेला आणि लाभलेला तो जणू अभी-शाप च असतो!!!!!

त्याच्या तुलनेत धीमी local आपल्या मर्यादेत असते, ती म्हणजे मध्यम वर्गीय माणसा सारखी खाली मान घालून आपलं  काम चोख करत असते. तिला कसला हि अभिमान नसतो, न कसला हि न्यूनगंड. सर्व स्थानकान वर थांबून, त्यांना त्यांचा पुरेसा मान देऊन, ती पुढे जात असते. भर धाव ती फक्त दोन स्टेशन च्या मध्ये ते ही बरच अंतर असल्या शिवाय जात नाही. कुठला ही भेदभाव ती करत नाही…… तिच्यासाठी सर्व स्टेशन सारखे आणि सर्व प्रवासी ही. कधी तरी तिला वेग घेण्याची हुक्की येते आणि ती एकदम स्टेशन मध्ये शिरते जशी आता न थांबताच जाणार, पण ते सगळ तेवढ्या पुरतं असतं आपल्या आईच्या ओरडण्या सारखं आणि ती परत हळू होऊन नीट थांबून सगळ्यांना घेऊन मगच निघते. एक विलक्षण शोशिक पणा आणि सय्यम हा त्यांचा स्थायी भाव आहे. कोणा बद्दल राग नाही आणि कोन बद्दल प्रेम ही फार नाही. निष्काम कर्मयोग करत असतात या गाड्या……. !!!!!


कधी कधी तर दोन जलद गाड्या आजू-बाजूला उभ्या राहिल्या कि विचारपूस ही करतात. संध्याकळी असच ३ आणि ४ वर दोन जलद गाड्या एकत्र येउन थांबल्या आणि त्यांची कुजबुज कानी पडली!!!!
४ ची लगेच ३ वाली ला खवचट पणे म्हणाली, "काय आज उशीर कसा काय!!…. एव्हाना ठाणे पार करायला हवस न ग!!!"
३ ची लगेच बोलली," अग!!।कय सांगू…ती जळली पंजाब मेल!!!… दररोज उशीरा येते न दादर ला… मग मला थांबावं लागत न, ती पुढे जाई पर्यंत!!!……… तू सांग तुला कसा आज उशीर??"
४ ची लगेच बोलली." तुझी पंजाब मेल……तर माझी Udyan Express!!!……. कल्याण ला तब्बल दीड तास उशीरा आल्या बाई साहेब!!……. मग काय आमच्या मध्ये घुसल्या ……… आम्ही खोळंबलो……मान द्यावा लागतो ना ह्यांना!!!!"
३ ची गाडी , "अग!!… मी ऐकलं आहे वेगळा track बांधणार आहेत म्हणे आता त्यांच्या साठी!!!!… बर होईल बाई अस झालं तर…. आपला खोळंबा तरी नाही होणार!!…बर चल-चल मी पळते आधीच उशीर झाला आहे…रात्री car-shed  ला भेटूच…Bye!!"
४ ची " हो हो!!...bye!!"

स्टेशन वर थांबलेले किंवा संध्याकाळी उतरलेले लोक सहज दृष्टीस पडतात, त्यांचे ते train च्या गर्दी ला कंटाळलेले चेहरे, तर त्याच गर्दीमुळे जवळ आलेले जोडपे, college  च्या रंगेलेले आणि नंतर स्टेशन वर ही न संपलेल्या गप्पा गोष्टी करणारे मित्र-मैत्रिणी, तर त्यातून बाहेर पडून office politics वर चर्चा करणारे चाकरमाने. कोणी स्वःताची दुखः सोडून आलेला तर कोणी आपली सुख!!!……. कोणी उत्सुक, कोणी थकलेले, कोणी आपल्या लहान मुलाला बघून पुन्हा उत्साहित झालेले असे सर्वच!!!!……… एकदा असाच बघत असताना अचानक माझं लक्ष त्या थांबलेल्या गाडी कडे गेलं, ३ नंबर वर थांबलेली ती, सगळे प्रवासी आपल्या घरट्याच्या दिशेने चालत असताना, त्यांच्या कडे बघत होती!!!

सगळे आनंदी, अजून एक दिवस कारणी लावला, आणि आता आपल्याघरी आपल्या माणसां समवेत उरलेला दिवस मजेत जाणार या आनंदात. ती त्या track वर मला एकाकी भासली, ती बघत होती बघुदा कि कोणी तिच्या कडे वळून बघत आहे का, कोणी तिची जाण ठेवत आहे का?? पण कोणीच नाही सगळे आप-आपल्या दिशेने निघून गेले. तिने भोंगा वाजवून त्यांना साद ही घातली, पण ते लोक तो आपल्या साठी नाही असं समझून लांबच जात राहिले. हीरमुसली झाली ती, अगदी रडवेली, इतक्या कष्टाने जीवाचा आटा-पिटा करून ज्यांना त्यांच्या घरच्या दिशेने पहुचवते, ही माणसे आपल्याकडे वळून ही बघत नाहीत. पण तिच्या कडे थांबून, त्यावर वेळ घावायला ही वेळ न्हवता. जाता-जाता मी उगाच तिच्या कडे बघून हसलो तर ती एकदम हसली जणू विचारतून भानावर आली आणि पटकन वेग घेऊन निघून गेली.

मी त्या गाड्यान मधल्या आणि स्टेशन वरच्या गर्दीत माझा एकांतच शोधत होतो!!…… एवढे लोक आजू-बाजूला असताना ही आपला अंतःकरणातील आवाज बरोबर ऐकू यायच्या!!!!!……….पण त्या दिवशी अस वाटलं मी एकटाच तिकडे एकटा न्हवतो!!!… जणू ती गाडी हि एकटीच होती!!!!!!.…आणी कदाचित भरपूर……………उपेक्षितं ही!!!!
त्या दीवसा नंतर माझा माणसां कडे नाही पण निव्वळ वस्तून कडे बघण्याचा द्रीष्टीकोण ही बद्दलला!!!!!!!


Thursday, July 4, 2013

कमाल करते हो पांडे जी!!!

इस कहानी के सारे पात्र और घटनाए वास्तवीक है और इनका काल्पनिकता से कोई संबंध नहीं है!!!!!....... अगर पढ़ते समय इसने, उसने, वो, हम, वे इत्यादि सर्वनामों के जगह अगर खुद को पाए तो अपना-अपना नाम लेकर भी इसे पढ़ सकते है!!!

सारे लोग परेशान थे, लोगों में असंतोष बढ़ रहा था। हम सारे किसी मसीहा की प्रतीक्षा कर रहे थे!!... हमें बचाने वाला, हमारे कष्ट दूर करने वाला कब आएगा, इसी इंतज़ार में अपने दिन या में कहूं राते बिता रहे थे!!! ऐसे मे हमारे office के वरिष्ठोने हमे ये खुशखबरी दी की हमे इस मुश्किल मे से निकालने के लिए वो मसीहा आ गया है!!!............... हमारे ख़ुशी का ठिकाना नहीं रहा।
फिर अगले दिन हमने office में उस मसीहा को देखा, सब लोगों में खुसर-फुसर शुरू हो गयी.....
कहीं ये वो तो नहीं.... कहीं ये वो तो नहीं!!!!!!

हमारी HR उसे हमे मिलाने के लिए लायी और एक लम्बे-चौड़े लड़का, दिखने में एकदम हीरो के जैसा, लम्बे  बाल, मुस्कुराता हुआ,कम-से-कम ६ फीट लंबा, जिसके बड़े-बड़े पंजो से हाथ मिलाकर ही कसरत करने वाले हाथ है, ये साफ़ समझ आता!!!!...... मैंने हाथ मिलाया और कहा,
"Hi, Ashish",
जवाब आया,
"Hi, Pappu Sharma"....
मेरे चेहरे पर उसने आश्चर्य और हसी दोनों पढ़ ली थी शायद क्यों की उसने बिना रुके हस्ते हुए कहाँ,
"real name ही Pappu  है Sir!!".....
में पूरी तरह से शर्मिंदा हुआ था, अपनी अश्चार्यता और हसी को शायद में इतने अच्छी तरह छुपा नहीं पाया!!!!.... मुझे लगा, उसे आदत थी मेरे जैसे लोगों की, अपने नाम से वो नहीं, उसके जवाब से शायद मेरे जैसे लोग शरमाते थे!!!...वो हस्ता हुआ चेहरा मगर याद रह गया!!!

मुझे उस वक़्त लगा की ये सच-मुच पागल है जो उसने ये नौकरी को हां बोला, उस वक़्त हम तो रात की उस project की चौकीदारी से बचने की ख़ुशी मना रहे थे!!.....जी हां!!!!!! चौकीदारी ही थी वो, क्यों की एक फटा  हुआ project बराबर चल रहा है या नहीं येही देखना था रात भर और अगर कुछ गड़बड़ लगे तो अपना दिमाग न लगाते हुए वरिष्ठो को phone करने का और उसके बाद client को। US का प्रोजेक्ट होने के वजह से रात भर बैठना पड़ता था जिसके लिए हम परेशां हो चुके थे!!!… ऐसा काम, जिस में सिखने जैसा छोड़ो मगर कोई काम भी नहीं है ऐसा काम क्यों लेगा कोई!!!......बहुत जल्दी अपनी धारणा बना लेना उस वक़्त आदत थी हमारी!..... जो जल्द ही बदलने वाली थी।

थोड़ी ही दिनों में हमारा काम दिन के दायरों को छोड़, रात में बहने लगा और हम दिन-रात office में रहने लगे। जिसका मतलब ये था की हम जिस "मसीहा" को अब भूल चुके थे, उससे अक्सर रूबरू होने लगे। मेरे और मेरे  दोस्त की जैसे जैसे उससे बातचीत बढ़ने लगी, वैसे वैसे हमे वो और भी दिलचस्प लगने लगा। बहुत दिनों तक वो हमारे रात का मनोरंजन था या जिसे हम अब शुद्ध "हिंदी" में "Time-Pass" कहते है। उसके साथ मजाक-मजाक में होने वाली बातचीत अब वक़्त के साथ अच्छी पहचान में बदल रही थी। एक ही उपनगर(suburb ) के होने कारन समानताये तो थी ही और बात करने के लिए विषय भी बहुत थे।  बात करते करते उसकी हिंदी भाषा की समझ और मुहावरे याद रहने लगे। में नागपुर मे कुछ वर्ष बिताने के कारन, हिंदी काफी सुधर गयी थी मगर मुंबई में वैसी ही हिंदी सुनकर अच्छा लग रहा था। 
हम उसे धीरे-धीरे समझने लगे थे। वो कहाँ से आया था, कैसे यहाँ तक पंहुचा था, कितने सालों तक क्या-क्या और कहाँ-कहाँ काम किया था,  ये सब बातों-बातों में हमे पता चला। उसका काम का और शायद काफी हद तक जिंदगी का तजुर्बा हमसे बहुत ज्यादा था और सब से महत्वपूर्ण बात ये की हमसे बहुत अलग था!!!....उस तजुर्बे ने उसे काफी जल्दी समझदार बनाया था, लोगों का सम्मान करना सिखाया था, सामने वाला अगर कोई चीज़ करता है या कहता है, तो उसमें उसकी भी कोई सोच या मजबूरी होगी समझने की ही नहीं स्वीकारने की भी ताकत थी उस में। सीधा-सीधा कहु तो वो सामने वाले को "मौका" देता था और खुद को उसे समझने के लिए वक़्त। उससे बातें करके में भी और शायद मेरा दोस्त भी काम के अलावा बहुत कुछ सिख रहे थे!!!......

दूसरी चीज़ जो उसको उस जैसे अनेकों से अलग करती थी और मुझे सब से ज्यादा भा गयी थी क्यों की मुझ में नहीं थी, वो थी "लगन" और जो भी, जैसा भी काम है उसे हस्ते हुए, लुफ्त उठाते हुए पूरा करना। वो रात भर अकेला बैठा रहता, कुछ पढता, खेलता, internet पे रहता मगर सोता नहीं था!!... हम सब कभी न कभी उस चौकीदारी में सोये थे, मगर वो जागता था। वो उस में भी खुश था। हम फिर उसे हमारे काम के बारे में बताने लगे, हमें शायद उस में एक अच्छा विकल्प दिख रहा था। अगर ये काम इतना मजा लेके करता है तो वाकई में अच्छा काम को किस तरह से अंजाम देगा ये हम सोच रहे थे। इसी बात को हमने हमारे वरिष्ठो को बताया, मगर अगर उसे वहां से हटाया तो रात की वो चौकीदारी कौन करेगा?? इस सवाल पर सब कुछ ठहर गया।
मेरे दोस्त ने युही उससे एक दिन।।।माफ़ कीजिये रात को, बातों-बातों में पुछा,
"आगे क्या करना है"......... झट से बोला
"Sir, आप के जैसा Programming आना चाहिए!.",
मेरे दोस्त ने फटकारा,
"क्या येही करते हुए आएगा, या अचानक सुबह उठके तू Progammer बनेगा!!.. " सीधी बात करना हम को कभी आया ही नहीं उससे!!!
"sir, आप बताओ, कुछ काम है तो दो ना, में करूँगा, सुबह रुकता हूँ!!...आपको दिखा कर जाऊंगा!!!".
उसे फिर हम छोटे-छोटे अंकगणित के क्रमादेश (algorithm ) लिखने के लिए देने लगे। हमने भी तो ऐसे ही शुरवात की थी, वो लिखता था, पूछता था, गाली खाता मगर फिर पूछके करता। थोड़े ही दिनों में उसे "logic" क्या होता है उससे क्रमादेश कैसे बनाना, फिर अपने ही क्रमादेश की जाच(testing) कैसे करना ये सब आने लगा।
उसे फिर मेरा दोस्त उसके project  में से छोटा-छोटा काम देने लगा। वो बिना जाने वो भी करने लगा और तब हमें लगा की इसे अब कोई संगणकीय-भाषा (programming  language)  सीखनी चाहिए। उसे Java  नहीं करना था इस लिए मेरे दोस्त ने उससे पढने के लिए Dotnet के ebooks, और online sites इत्यादि की जानकारी दी। उसके बाद तो उसकी Technical Ragging होती थी ये कहना ही उचित होगा!!!

धीरे-धीरे उसे समझने लगा, हमने जो हमारे Masters में सिखा था उसे सिखाने लगे। हमें भी नहीं आता था, मगर जितना आता था उसे बताते थे, थोड़ी ही दिनों में मुझे लगने लगा की गाली दे-दे के सिखाया हुआ, सिखने के लिए उकसाया हुआ Pappu अब अपने खुद के गती से प्रगति कर रहा था। उसके होशियारी पे कभी भी शक नहीं था, नहीं थी तो उसके पास दिशा!! अगर हमारे जैसे बकायदा महा-विद्यालयों में वगेरे पढता तो हमसे बहुत आगे निकल जाता और हम ही उससे सिख रहे होते!!!

उसे मगर हम से technology या programming के अलवा भी बहुत सिखना था, उसे जीने का एक नया सलीका, एक नयी सोच मिल रही थी, उसे अपनी परिस्थिति को बदलने का रास्ता और विश्वास दोनों मिल गए थे!!!...... Pappu उस रस्ते पर अब भागने लगा था!!... उसे अब मेरी या मेरे दोस्त की कोई जरुरत नहीं थी। शायद इस के बाद हमको Pappu  नाम के दोस्त की जरुरत थी।

Pappu से अब "Sir" धीरे-धीरे छुट रहा था। में Ashish Sir से सिर्फ Ashish हो रहा था.... मैंने न कभी उसे मुझे Sir बुलाने के वक़्त टोका था न अब "Sir " न बुलाने के लिए। कुछ दिनों बाद में Ashish  से "अबे साले!!!..Ashish!!!" बनने वाला था। मगर उसकी सिर्फ ख़ुशी ही थी!!!!!.... Pappu अब आखिर कार Mr. Pappu Sharma बन रहा था!!!... मैंने किसी को इतने जल्दी खुद को उभारते हुए, खुद में परिवर्तीन लाते हुए नहीं देखा था। मैंने उसका ये परिवर्तन अपनी आँखों के सामने होते हुए देखा था!!.... बहुत छोटा, मगर मेरा हाथ था उस में!..इस बात की उतनी ही बड़ी ख़ुशी थी!!!!

अब तक तो हम काफी अच्छे दोस्त बन गए थे। वो हमारे कॉलेज के सिर्फ किस्सों से ही नहीं उन किस्सों में बसे हमारे दोस्तों से भी वाकिफ होने लगा। एक ही उपनगर के होने के कारन हमारा छुट्टी के दिन मिलना शुरू हुआ और देखते ही देखते पप्पू हमारे समूह का हिस्सा बन गया। मैंने तो सिर्फ उसे मिलाया था, मगर जिस तरह से वो घुलमिल गया, ऐसा लगता था की पहेले से हम सब को जानता हो।

उसके घर के मटन और चिकन की बातें होती, कभी वो खुद बनाके लाता, कभी सोचा था की ये बुलाएगा, "चल!! मेरे घर खाने!!!", मगर नहीं उसने कभी नहीं बुलाया... और यार-दोस्तों के घर हम जबरदस्ती के मेहमान बनते मगर मैंने उसे कभी भी इस बात के लिए जोर नहीं दिया!!!!...... कुछ चीज़ें जाहिर नहीं करना चाहता था, और मैंने कभी पूछी भी नहीं!!!...न कभी जानने की कोशिश की!!!! हमारे अलावा भी एक दुनिया थी उसकी, दोनों दुनिया में सिर्फ वो आ-जा सकता था, हमको उसकी इजाज़त नहीं थी। दुनिया भर के लोगों के प्रश्न पर ये घंटो उनसे बातें करता, लड़कियां भी थी उन में, मगर पूछो तो कुछ बताता नहीं था!!!..... मुझे तो ऐसे लगता था की दूसरों के प्रश्नों को, बातों को, सुनके, उन पर सलाह-मशवार्हा करके कभी-कभी उसे अपने प्रश्नों के उत्तर मिल जाते!!!... वो उन लोगों का हौसला बढ़ाते-बढ़ाते अपनी परिस्थितयों से लड़ने का हौसला पाता था!!!...

जो भी हो आज वो मेरे दोस्तों के गट का अभिवाज्य घटक था, वो रहेगा तो ठीक है मगर नहीं रहेग तो कमी खलती है, हम सब एक दुसरे का मजाक उड़ाते है मगर आज भी उसे गाली देने में जो "ख़ुशी या आनंद" मिलता  है उसकी कोई तुलना नहीं!!...शायद ये बात उसे भी पता है!!...उसका मजाक, फिर चाहे उसकी इंग्लिश सुधरने की हो, किसी लड़की से नाम से चिढाना हो, अब तो उसे नया फ़िल्मी नाम भी मिला है दबंद के हमारे अपने "पांडेजी!!!...",इन सबकी सिर्फ हसी नहीं आती, इस सबका एक अलग मजा एक अलग से ख़ुशी, वो ख़ुशी इस लिए क्यों की उस पर बहुत भरोसा है की वो न कभी बुरा मान लेगा, ना कभी पलट कर दिल दुखायेगा।

आज उसके पास एक अच्छी नौकरी है, एक अपना खुद का घर है, जो शायद उसका सब से बड़ा सपना था। विदेश में रहता है.... मगर आज भी जब भी उसे पुकारता  हु तो,"अबे साले Pappu!!" इसी तरह पुकारता हूँ!!!.... और उसके के बाद उसे ," sorry यार!!" कहता हूँ!! आज करीब ८ साल हो गए हमारी दोस्ती को, कभी नहीं सोचा था उससे पहली बार हाथ मिलाते वक़्त की, ये पहचान ये रंग लाएगी!!!!!

कुछ नए दोस्तों को हमारे पुराने किस्से सुना रहा था, सुनते हुए कहाँ, "ऐसा है मेरा दोस्त Pappu!!!......."
वे मुझे देख रहे थे या नहीं, पता नहीं, वो अस्चर्य, वो हसी उन में भी थी या नहीं, पता नहीं, क्यों की, तुरंत आगे में खुदे से ही कहता चला गया,
"real name ही Pappu है!!!!..... कमाल का बंदा है और मेरा सब से अच्छा दोस्त!!".

Tuesday, May 14, 2013

में और मेरी तन्हाई........................


में, और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते है ।।।।।।

की कब..............................
सुबह की पुरवाई तुम्हारी खुशबू उडाकर  लाएगी !!!
कब.............................. 
भवरों की गुंजन में तुम्हारे गीत होंगे।।
कब.............................. 
बेजान पेड़ों की शाखों पर नया जीवन खिलेगा।।
कब..............................
मौसम में नयी बहारों की उमंग आएगी??
कब.............................. 
पत्तो की सलसलाहट तुम्हारी क़दमों से होगी???
कब.............................. 
तुम्हारे आँचल के रंग से मेरा आसमां रंगीन होगा !!!!
कब..............................
फूलों को छुते ही तुम्हारे स्पर्श का एहसास होगा!!
कब.............................. 
सिर्फ तुम्हारे होने का एहसास नहीं तुम्हे महसूस करूँगा!!!
कब..……………. .कब…………………… कब………………!!!!!
में, और मेरी तन्हाई, अक्सर ……. सिर्फ तुम्हारी ही बातें करते है!!!!!
अक्सर सिर्फ तुम्हारी ही बातें करते है……………

Monday, May 13, 2013

असं एक पत्र!!!!

बघावं का आपण ही……असं एक पत्र लिहून??
कागदांचे गाल ही….गुलाबी रंगवून !!

माझ्या ओठांन मागे लपवलेलं ….
बघूया कोरऱ्या कागदावर उलगडलेलं !!

माझ्या अनंत प्रेमाला
शब्दांच्या सीमेत बांधलेलं!!!

तुझ्या मनातलं असेल जरी
तरीही माझ्या मनाने लिहिलेलं!!

तुझ्या पापण्यांच्या मागचे चित्र…
माझ्या शब्दांनी रंगवलेलं!!!

तुझ्या स्वप्नांच्या विश्वाला
माझ्या लेखणीने साकारलेलं!!

तुझ्या मौनाचे अर्थ 
त्यात अचूक टिपलेलं !!

तु उगाच लाजावस म्हणून…
तुझ गुपित लिहिलेल!!

तुझ्या निरागस सौंदर्याचं…
ते प्रतिबिंब असेलेलं!!!

माझ्या शब्दांच्या स्पर्शानं…
तुला मोहरून टाकणारं!!!

बघावं का आपण ही……असं एक पत्र लिहून??
माझ्या जीवनाच्या कागदावर
तुझ्याच शब्दांनी लिहिलेलं!!

Friday, April 5, 2013

कागदी आयुष्य माझे.....

कागदी आयुष्य माझे
तुजला द्यायचे होते!!
तुझ्या रंगांनी मग ते
रंगवून घ्यायचे होते!!

सकाळच्या गाली तुझ्या गालांची लाली
फुलांन मध्ये, तुझ्या ओठांची गुलाबी….
मेहंदीच्या रंगाने रंगल्या संध्यकाळी
काळ्याभोर केसांनी मग रंगवल्या राती!!

तुझ्या डोळ्यांनी भरले….
माझ्या स्वप्नांन मध्ये रंग!!
माझ्या सुखांच्या दारी लावली…
तुझ्या हास्याची तोरणं!!

प्रत्येक सणाला काढली…. 
तुझ्या उत्साहाची रांगोळी!!!
घर हि सजवले मग……
तुझ्या आवडत्या रंगांनी 

तुझे रंग माझ्या ध्यानी
तुझेच भाव माझ्या मनी
स्वतःचे म्हणून रंगवले जरी
चित्र आपलेच रेखाटले नेहमी!!!

आठवणींच्या रंगातुनी
त्या अनमोल क्षणांच्या छटांनी!!
चित्र तुझेच नव्याने बनते
माझ्या एकाकी वर्तमानी …


Wednesday, March 27, 2013

प्रेम

Lighter चा खटकन आवाज झाला आणि त्याच्या प्रकाशाने आमच्यामधलं अंतर एकदम कमी झालं. hotel च्या waiter  ने मग आमच्या समोर ठेवलेली मेणबत्ती पेटवली आणि निघून गेला. कुठलंही नवीन restaurant दिसलं की तिथे जाऊन एकदा तिकडचं जेवण चाखायचं हा आम्हाला लागलेला नवीन पण खर्चिक छंद होता. आम्ही चांगले मित्र होतोच, हो!! म्हणजे तशी ती special  मैत्रीण होती किंवा आहे पण प्रेम वगैरे नव्हतं, किंवा ते असलं तरी आम्ही एकमेकांना तसं काही जाणवू दिलं नव्हतं. कदाचित जाणवू न देता जे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची, असण्याची जाणीव करून देतं त्यालाच प्रेम म्हणत असावेत!!!!!!!


candle light मध्ये आम्ही दोघं थोडे अस्वस्थ झालो होतो खरे, पण दोघांनाही या गोष्टीची कल्पना नसल्याचं  कळल्यानंतर एकच हशा पिकला आणि आम्ही relax झालो. मला ती आवडायची यात काही वाद नव्हता पण ते प्रेम आहे कि नाही, तिला काय वाटत असेल, नुसतंच आकर्षण नाही कश्यावरून असे काही मुलभूत प्रश्न मला पडले होते. एक गोष्ट नक्की होती कि मला ती मैत्री आणि त्या नात्यामधली  मजा, तो गोडवा टिकवायचा होता. बघू पुढे काय होतंय असं म्हणत कदाचित दोघेही ते पुढे ढकलत होतो!!!!….



waiter ने menu card आणून दिलं आणि नेहमीप्रमाणे, order ठरवण्याचं आणि देण्याचं काम माझं असल्यामुळे मी त्यात डोकं घातलं. सगळं ठरवून order दिली आणि आम्ही निवांत गप्पा मारायला लागलो. आठवड्याच्या घडामोडींची उजळणी सुरु झाली. मला नेहमी आश्चर्य वाटायचं कि तिच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक निराळाच दृष्टीको असायचा. मी ना कधी ते साधेपण समजू शकलो ना  कधी ते स्वतःमध्ये आणू शकलो. पण तिचं सगळं अगदी सोपं, साधं, सरळ, नितळ, स्वछ होतं…!!!!!

तिच्या सांगण्याच्या उत्साहाला उधाण आलं कि मला फार गंमत वाटायची आणि अशार्याही, आश्चर्य याचं कि कुठल्याही छोट्या गोष्टीमधले बारकावे, संवेदना तिला बरोबर कळायच्या,……  स्पर्श करायच्या!!!! 



त्या मिण-मिणत्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून गेला होता. माझं लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेलं, आणि त्याक्षणी पहिल्यांदा कदाचित मला त्या असलेल्या, लपलेल्या प्रेमाची जाणीव झाली. ते डोळे प्रकाश कमी झाला कि चमकत होतेम्हणजे त्यातली ती चमक अंधारातही एखाद्या ताऱ्याप्रमाणे लक्ष वेधून घेणारी होती. बोलताना ते भाव पहिले डोळ्यात आणि मग शब्दात यायचे. ती स्वप्नं, ते सत्य सगळं एकाच त्या डोळ्यांमधून वेग-वेगळ्या भावांतून व्यक्त होत होतं. गंमत सांगताना, आपली खोडी सांगताना ते मिश्किल व्हायचे, परत कुठली भावनाप्रधान गोष्ट सांगताना भावूक…. . ते भावनांचे विश्व-रूप दर्शनच होतेआणि मी त्या विश्वात हळू हळू रमत होतो आणि हरवतही!!!!. ते मध्येच एखादी गोष्ट सांगताना झुकायचे, लाजायचे. लाजरे भाव त्या डोळ्यांना इतके छान दिसतात याची कल्पनाच नव्हती केली मी कधी!!!आपल्या स्पर्शाने लाजतील का ते डोळे अशी कल्पना माझ्या मनात आली आणि स्वतःचं हसू आलं!!!!!……

मला वाटलं हीच का ती मुलगी, जिच्याबरोबर इतक्या वेळा फिरलो पण याकडे कधी लक्ष का नाही गेलं? कदाचित बाहेरच्या लख्ख प्रकाशात त्यांच्याकडे बघणंच झालं नाही!!!इतकी दुसरी प्रलोभनं लक्ष वेधून घेतात की, आपल्या जवळ वढा खजिना दडला आहे हे कधी बघितलच नाही मी!!

त्या मंद प्रकाशात दुसरं काहीच बघू न शकणारे माझे डोळे आज फक्त हेच बघत होते!!!

मला पूर्णपणे त्या प्रेमाची जाणीव होत होती. माझ्या स्वतः बद्दल असलेल्या शंका दूर होत होत्या…. मला त्या डोळ्यांना नेहमी असंच बोलकं ठेवायचं होत. त्यात ती स्वप्नं  तशीच जगवायची होती, किंबहुना नवीन नवीन स्वप्नं त्यांनी निर्धास्तपणे पहावीत  असा विश्वास द्यायचा होता. कुठली मोलाची, महत्वाची गोष्ट सांगताना त्यात माझ्यासाठी असलेला विश्वास दाटून यायचा. स्वतःचा अश्यावेळेस मला पहिल्यांदा उगाच अभिमान वाटला. कोणीतरी समोर आपल्यावर एवढा विश्वास ठेवतं हे खूप सुखावणारं होतं. मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. 


ती काहीतरी विचारात होती आणि मी काहीच बोलत न्हवतो, लक्ष हरवून बसलो होतो(माझं लक्ष भलतीकडेच होतं) किंवा एक नवीन लक्ष डोळ्यासमोर तयार होत होतं. तिने पटकन माझ्या हातावर हा  ठेवला आणि मला म्हणाली "helloooo!!!… कुठे लक्ष आहे!!कसला विचार चालू आहे डोक्यात…….", तिच्या स्पर्शात अजून हरवून गेलो आणि होकार द्यायच्याऐवजी तो हा अलगद हातातच धरला!!!!!

एका सेकंदात भानावर आलो, आपण काय करतोय हे लक्षात येताच, हात सोडून, ते संभाषण पुढे नेलं. तिच्या लक्षात आलं असेल का, तिला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे तेमी थोडा अस्वस्थ झालो. मन म्हणालं कठीण आहे कळणएक सेकंद फक्त धरला होता!!!!

मी परत तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागलो. या वेळेस ते डोळे मात्र झुकेलेल होते, थोडे लाजरे, कसलीशी वाट बघत होते कि काय अस वाटत होतं. मी आपलं उगाच इकडचे तिकडचे विषय आणि बाष्कळ विनोद करत होतो…… त्या डोळ्यांवरून नजर हटत नव्हती, पण आता ते झुकलेलेच होते, मी तिच्याकडे बघत होतो हे बहुदा तिला कळतंय अस वाटत होतं, तीच्या ओठांवर एका कळीप्रमाणे हळू हळू मध्येच हसू फुलत होतं. तिलाहि कदाचित त्या प्रेमाची जाणीव होत होती. हीच ती आणि हेच ते जे आपल्याला हवंय हे कळून चुकलं होतं.



तेवढ्यात तिचा mobile वाजला, ती उठून बाहेर जाण्यासाठी वळाली तोच मागे असलेल्या waiter चा धक्का लागला आणि त्याच्या हातातलं जेवण खाली जमिनीवर पडलं आणि प्लेट्स फुटल्याचा आवाज झाला. त्या धक्क्याने तिच्या हातातली तिची छडी खाली पडली. तिला काहीच कळेना, खाली काचा लागतील म्हणून ती बाजूला होताच, तिचा तोल गेला आणि मी एकदम उठून लगेच तिचा हात धरला. तिची पडलेली काठी उचलून तिच्या हातात दिली. ती सावर्तास सावरताच मी हात सोडला. ती अजून थोडी घाबरली होती, माझ्या दिशेचा अंदाज घेऊन शून्यात बघत होती. तिचा हात अजूनही माझा हात शोधत होता. मी थोडं घाबरतच परत माझा हात तिच्या हातात दिला, तिने एकदम पकड घट्ट केली. मला म्हणाली," हात का सोडलास…… माझा!!दोन्ही वेळा!!!!… ??".
मी चपापलो, तिला कळलं होतं ……. आपण हात धरला होता ते, "मला तुला फक्त आधार नाही तुझी साथ द्यायची आहे!!!!!" मी म्हणालो.


ती म्हणाली, "मगमाझ्यावर आणि माझ्या प्रेमावर दोघांवरही  विश्वास नव्हता नंतुझं प्रेम कळणार नाही अस वाटलं होतं ना!!!".मी नि:शब्द होऊन मान हलवत नाही म्हणत होतो तेवढ्यात तीच  म्हणाली." बावळट!!!!मान काय हलवतोयस "नाही" म्हणूननाही म्हण….तुला माहितीये ना मला दिसत नाही!!!!"…… अस म्हणून आपला दुसऱ्या हातातली काठी सोडून तो हि हाथ माझ्या हातात दिला ……...….आणि जे मला किंवा तिला बोलताही आलं नसतं ते.. ते सगळं सगळं तिचे डोळे माझ्याशी बोलत राहिले.होती!!!!!

[[[[नजरेतून एवढी स्पष्ट व सुंदररित्या व्यक्त होणारी प्रेमासारखी दुसरी भावना नसूनही, "प्रेम आंधळ असतं" असं का म्हणतात असा विचार मी करू लागलो!!!!!!!!]]]]

Thursday, March 14, 2013

तेरे रंगों में..

तेरे रंगों में रंगीन है नज़ारें
तेरे रंगों में रंगीन ये फ़िजाए
तेरे रंग लेके बना है इन्द्रधनुष
तेरे रंगाए हुए नीले असमान में।।

तेरे रंग में रंगीन झरोखें
तेरे रंग में रंगी है दीवारें
तेरे रंग से खिली मेरी बगिया
तेरे रंग से सजा है मेरा आँगन

तेरे रंग में रंगे है मेरे सपने
तेरे ही रंग में रंगा हर सच
तेरे रंग से दमकती है खुशियाँ
तेरे रंग से धुन्दला जाते है दुख

तेरे रंग में रंगीन है दिन
तेरे ही रंग में रंगीन शाम!!!
तेरे रंगों में रंगे है रिश्ते
तेरे रंग में रंगी मुस्कान

तेरे रंगों से खिलती है रंगोली
तेरे रंगों में रंगी है होली
तेरे रंग से रोशन दिवाली
तेरे रंग में रंगी है जिंदगी

Wednesday, March 13, 2013

तो क्षण….

तुझा चेहरा ओंजळीत…
उतरला चंद्र अंगणात
स्पर्शास आतुर झालेले
लाजरे डोळे ते झुकलेले

केस तुझे ते विखुरलेले
प्रेमाचे रहस्य लपवलेले
प्रेमाच्या या नवीन जाणीवा….
भान हरवून गेलेले!!!!

माझ्या प्रीतीचे हसू
तुझ्या गाली थोडे ओघळलेले
अबोल प्रेमाचे शब्द जसे
कापऱ्या ओठांनी शिवलेले

गंध तुझा दर्वळता
श्वासांचे आवेग वाढलेले
मनी प्रेम ओथंबलेले
रोम रोमातुनी जाणवत असलेले

समर्पणाची चाहूल लागता
ह्रिदय ही बेताल झालेले
पहिला स्पर्श तो होताच
अंग माझे ही शहारलेले

प्रेम मनातून वाहून
स्पर्शात तुझ्या मिसळेले
मीठीत एक-मेकांच्या मग
तन-मन आपले विरघळलेले

Monday, March 11, 2013

तुमसे ही....


एक हसी के लिए
यहाँ वहां घूम रहे थे!!
तुम्हारा मिलना ही काफी था!!!

एक हसी के लिए
अपने आंसू छुपा रहे थे
तुम्हारा मुस्कुराना ही काफी था!!!!

एक हसी के लिए
अपने ज़खमो को सेह रहे थे
तुम्हारा मरहम ही काफी था!!!

एक हसी के लिए
झूठे बहाने ढूँढ रहे थे
तुम्हारा एक सच ही काफी था!!!!

एक हसी के लिए
अपने आप को संभाले हुए थे
तुम्हारा हाथ थामना ही काफी था!!!!

एक हसी के लिए
कई राहें आजमाई थी
तुम्हारा साथ चलना ही काफी था!!!!!

एक हसी के लिए
परायों को अपना बनाया
तुम्हारा गले लगाना ही काफी था

एक हसी खिलने के लिए
कई बहारें लौट गयी
तुम्हारा आना ही काफी थी!!!!

एक हसी के लिए
अपने आप से झगड़ रहे थे
तुम्हारा प्यार ही काफी था!!!


Monday, March 4, 2013

बम विस्फोट

कुछ लोगों ने लायी मौत
जिंदगी के बाज़ार में
सस्ती जिंदगी बिक गयी
मौत के ईस सौदे में.......

जले हाथ, जले पैर
जले तन, जले मन
जले न जाने कितने घर
और जल गए कितने अरमान!!!!

कहीं ढूंढती , सहमी आँखें
कहीं अपाहिच हुई जिंदगी
कहीं तिनका-तिनका हुए थे सपने
कहीं बिख्ररी हुई आशायें

कहीं थैले में से तुटे खिलौने!!
कहीं रोती, बिलगती आवाज़े
कहीं ममता पड़ी थी लहूलुहान
कहीं बेजान हाथों ने पकड़ी थी नन्ही जान!!!

हिन्दू मरे या मुसलमान
अपने मरे या पराये
धर्मनिर्पेक्ष थी तो सिर्फ वो मौत
जिसने किया ना कोई भेद!!!!!!!

भगत सिंग के धमाके से जागे थे लोग
जागी थी बेहेरी "परायी" सरकार!!!
धमाके के आदि लोग यहाँ!!!!
और उनसे भी बेहेरी "अपनी" सरकार






Wednesday, February 6, 2013

तो वेळ तुझा....

तुझ्या साठी असेलेला वेळ,
तुझ्या बरोबर कधीच नसतो....

तुला एक नजंर बघावं म्हणून ...
तुझ्या  वाटेवर मग तो
माझ्या सोबत थांबला असतो!!

सोबत तुझ्या मी, तुझा होऊनी बसतो.
एकाकी मग तो……
स्वतःलाच संपवत असतो!!!!

तुला प्रेम कळेल,
कधी ही काळी उमलेल??
याच उत्तर तो, एकटाच शोधत बसतो!!!

तुझ्या साठी असेलेला वेळ,
तुझ्या बरोबर कधीच नसतो....
तुझी आठवण काढत आता…
तुझीच बाजू मांडत असतो…।

तू नसलीस तरी आता...
तो नेहमी तुझाच असतो…
तुझ्या विरहात तो ही, तीळ-तीळ मरत असतो!!!!!

सोडून गेलीस लांब तू
अश्रू पुसायला माझे
मागे सोबत तोच असतो!!!

सरकायचे असता पुढे त्याला….
तुझ्या आठवणी मागेच रमतो!!
तुझ्या साठी असेलेला वेळ…आज तुझ्याच बरोबरच नेहमी असतो!!!!

Tuesday, February 5, 2013

थोडं-थोडंक!!

सुख थोड,  दुःख थोड
रडू थोड, हसू थोड.
गोळा बेरीज करिता शेवटी...
राहिल का काही आपल्या हाती ???

स्वप्नं माझे.. स्वप्नं तुझे..
थोडे पूर्ण, बरेच अपूर्ण!!!
मन वेडे तरी ही स्वप्न पाहे..
थोडे वास्तव , थोडे रंजन!!

मौनात सारे , शब्दात थोडे
डोळ्यात थोडे, ह्रिदयात केवढे!!!
भाव असे हे आपल्या मनातले....
न बोलता ही थोडे कळले असते........!!!

थोडं तुझं, थोडं माझं..
एकत्र करून जोडू सारं!!
साकारू छोटुसं विश्व आपूलं
थोडं तुझं, थोडं माझं..

थोडं बघूया निस्वार्थ होऊन..
थोडं दुसऱ्यासाठी ही आपण जगून...
मिळेल थोडी शांतता, थोडंसं समाधान!
जगण्यास थोडी वेगळी दिशा!!

थोडं कमी, थोडं जास्ती
नेमकं, बरोबर असं काहीच नाही!!!!
थोडं अजून हवय म्हणून...
जगायचच थोडं जातं राहून !!!!!
जगायचच थोडं जातं राहून !!!!!

Wednesday, January 30, 2013

पोरकं!!!!

"We now request all the remaining passengers to board the aircraft". अशी सूचना ऐकू आली कि एका यंत्रा  सारखा आपलं सामान घेऊन, Terminal मधून बाहेर पडून विमाना च्या दिशेने चालत असताना, अचानक मागून एक आवाज ऐकू आला ."चाललास का रे, तू मला सोडून??" त्या आवाजातील आर्तता, व्याकुळता ऐकून मी नकळत त्या आवाजा कडे खेचलो गेलो..... मी वळालो, जणू ती हाक माझ्यासाठीच होती. मागे वळून बघतो तर कोणीच नाही, मला भास झाला असावा असं म्हणत मी परत विमाना च्या दिशेने निघालो, एक पाउल पुढे टाकताच परत तोच आवाज, तीच उत्कटता आणि तेच प्रेम!!!!!!....
या वेळेला मात्र मी तो आवाज नीट ऐकला होता, मी थांबलो ...इकडे तिकडे बघितलं...कोणीच नाही!!!!!... पण या वेळेस मी थबकलो होतो, विचार डोक्यात गर्दी करत असतानाच पुन्हा तोच आवाज आला, या वेळेस थोडं  बळ होत त्यात. "चाललास का तू पण..... मला सोडून!!!!".
मी विचारलं "माझ्याशी बोलता आहात का...कोण आहात तुम्ही, मला दिसत का नाहीत!!!". तेच उत्तर आलं," हो तूच!!!, तुझ्याशीच  बोलते आहे. मी इकडे अश्या हाका मारत असते फार थोडे ऐकतात, काही ऐकून न ऐकल्या सारखं करतात, तू ऐकून थांबलास...... बरं वाटलं!!!!".
मी विचारलं ,"कोण आहात तुम्ही, माझी आई तर विमान-तळा च्या बाहेर आहे , कदाचित एव्हाना घरी ही गेली असेल....". पटकन उत्तर आलं ,
" मी ही आई च आहे, फक्त फरक येवढाच, की त्या जन्मदात्या आई साठी तू परत येशील, किंवा तिला बोलावून घेशील.....आणि ती ही येईल.....पण मी नाही येऊ शकत.....मला तुझ्या सारखं  सगळं सोडून नाही येत येणार आणि तू ही माझ्या साठी परत नाही येणार!!!... माझी आठवण ही  नाही येणार आणि मला कश्यात गृहीत ही नाही धरणार..... तशी ही माझी आठवण फक्त वर्षातून दोनदाच होते.....ते ही सुट्टी मिळते म्हणून...नाही का!!!!!"
मी स्तब्ध उभा होतो, मला शब्द फुटेना.... हे सर्व माझ्या बरोबर घडत आहे, हेच खरं  वाटत न्हवत. माझी भारत भूमी माझ्या शी बोलत होती!!!!!!........मी हळूच विचारलं, " माझ्या कडून काय हवं आहे तुम्हाला???". उत्तर आलं , "तू...". मी अशार्याने म्हंटल ," मी!!!!"...... मी म्हणजे!!".
"अरे!!, आश्चर्य कश्याच येवढं!!, एका आई ला आपला मुलगाच हवा असणार न!!, आश्चर्य काय त्यात!!!..." ती म्हणाली.
"अहो!! पण मी हवा आहे म्हणजे काय!!.... मी निघालो आहे... विमानात बसणार आता...आणि..........." मला या पुढे काही सुचेच ना!!!!..... मी शब्द शोधत असताना तीच म्हणाली...
".....आणी  लांब निघून जाणार, परत कधी ही  न येण्यासाठी, मला सोडून..........". मला न बोलावलेलं  वाक्य स्पष्ट पणे पूर्ण केलं!!!!
मी अजून ही शब्दच शोधत होतो ," अहो!!!! नाही.......म्हणजे कायमच असं  नाही...पण....काही वर्ष असं....म्हणजे............." आणी  थोडे थोडके शब्द  जे भाषे कडून उसने आणले होते, ते ही खर्च करून टाकले.
" का जातोस!!!.... थांब इकडेच..... एक मला तूर्तास बाजूला ठेव, बाकी सर्व तर इकडेच आहे ना तुझं...."
"बाकी सर्व, काय सर्व!!!!.... सर्व, त्रास होणाऱ्या आणि देणाऱ्या गोष्टीच तर जास्ती आहेत, नाही का!!!"..."काय आहे सांगां..... सगळे जवळचे मित्र बाहेर, नातवाईक बाहेर, जे आहेत ते वर्षानुवर्ष भेटत नाहीत....सगळे नुसते लढ म्हंटल्या सारखे आयुष्य जगताआहेत... आपल्याला काय हवंय आहे, किती हवं आहे, कुठे पहुचायचं आहे याचा विचार न करता फक्त धावत आहेत. ठेच लागते रक्त ओघळत, आपला धक्का लागून दुसरा पडून जखमी होतो, ते बघायला ही थांबत नाहीत...............का कोणासाठी मग मी थांबू!!!"
उत्तर आलं, "माझ्या साठी थांब!!!!".
मी पटकन बोललो, "कोणासाठी.... तुमच्या साठी....म्हणजे तुम्हाला म्हनायचं देशा साठी!!!!!!"..
त्या म्हणाल्या. "देऎएश!!!...हे कधी गृहीत च धरत नाही ना तुम्ही, त्याची ही काही गरज असेल, त्याच्यासाठी ही तुमचं काही कर्तव्य आहे ...असा विचार पण नाही येत!!!........ का असं व्हावं!!!!"
"का सांगावं लागतं तुम्हाला की आपल्या जन्म दात्या आई बरोबरच माझ्या सारख्या आई साठी पण तुमचं कर्तव्य आहे!!!!!...तिच्या एवढी किंवा जास्ती मला तुमची गरज आहे!!!..."
माझ्या मनात खरच एकदा ही "मी माझा देश सोडून जातो आहे" हे शिवलं ही  न्हवत, मी माझ्या निर्णया मध्ये देशाचा किंवा समजाचा कधीच विचार केला न्हवता.....आता अचानक दुर्लक्ष केलेली ही आई मला जाब विचारात होती!!!!!!
मी नेहमी प्रमाणे, जवाबदारी झटकून टाकण्याची ठरलेली किंवा स्वतःहून ठरवलेली कारणं द्यायला लागलो...... "कुठचा देश, हा देश जिथे मी सकाळी गेलो की येई पर्यंत घरचे चिंतेत असतात, की हा देश जिथे रोजचा साधा कामावर जायचा प्रवास ही जीवघेणा असतो, की तो देश जिथे बापाला आपलं पोर दोन-दोन दिवस झोपलेलंच दिसतं, की तो देश जिथे महागाई चा बकासुर झाला आहे ज्याला संपवणारे पांडव दिसतच नाहीत आणि कौरव १०० नाही तर १०० कोटी झाले आहेत!!!!!......कुठल्या देशा साठी थांबायचं ..... जिथे एक एक दिवस हा लढून, स्वतःचा रोज एक छोटा अंश, मग तो शारीरिक असो का मानसिक, संपवून, नष्ट करून मावळतो. असे बरेच वर्ष स्वतःला संपवून,आयुष्य शेवटी अंथरून ला चिटकून, रोजच्या धकाधकीने दिलेल्या आजारांना बळी पडून किंवा काही अवेळी, अकाली एखाद्या अपघातात किंवा विस्फोटात आणि काहीच नाही तर दंगलीत संपतं !!!!!!....ह्या देशासाठी थांबू!!!!"
"जिथे पिकतं तिथे विकत नाही अस म्हणतात पण आपल्या कडे तर ही म्हण माणसां बाबतीत च खरी ठरली आहे....इतकी माणसं पिकवतो आपण की माणसाची च कदर नाही माणसालाच !!!!!..... अश्या साठी राहायचं इथे!!!!..... "
त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि मग म्हणाली, "हे सर्व देशाने दिलं तुला...किंवा या पलीकडे देशाने काहीच दिल  नाही???....... तू जे जे आता म्हणालास त्या पेकी काय देशाने दिल आहे!!!!....अपघात, विस्फोट, खराब रस्ते, भ्रष्टाचार, महागाई, जन संख्या हे देशाने दिले आहेत, का काही याच मातीत जन्मेलेल्या, तुझ्याच भावंडांच्या कर्माची फळे आहेत.
तू आपल्या घराच्या चाव्या चोराच्या हाती दिल्यास ....तो ते लूटणारच!!!!!..... अरे!!!... बस मध्ये चढल्या वर, कोणाच्या बाजूला बसायचं हे ही पारखून, स्वतःची खात्री करून मग बसणारे तुम्ही, देश कोणाच्या हातात देत आहात हे ही बघत नाहीत.......तोचुकीच्या माणसांना चालवायला दिला आहेस, ही त्याचे फळे आहे!!!!!"
आपल्या जबाबदारी न ओळखता, दुसर्याला दोष देऊन, शेवटी निव्वळ अप्पलपोटे पणा दाखवून, परीस्थिती शी लढायचं सोडून पाठ फिरवून पळून जातो आहेस!!!!.असं  नाही वाटत तुला."
"म्हणजे!!, थोडक्यात काय तर भगत सिंग जन्माला यावा, पण तो शेजारी......नाही का!!.....त्याच्या चितेच्या निखार्याने आपली घरं , आयुष्य उजळी तर ते हवे आहे पण त्या चिते वरचे प्रेत आपले नको!!!!".
"ही  परिस्थिती बदलायचा, त्यात काही तरी फरक पाडण्याचा, किंवा जे आण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याशी जोडून घेण्याचा तरी प्रयत्न केलास का कधी..... तू जातो आहेस याचं वाईट नाही वाटत आहे, तू प्रयत्न न करता, हा पराभव गृहीत धरला आहेस याची खंत आहे......"
"अरे, आपल्या देशाच्या निवडणुकी पेक्षा अमेरिके ची निवडणूक जास्ती उतुस्क्तेने बघणारे आणि ऐकणारे तुम्ही, तुम्हाला काय सांगयचं."
"राजे-शाहीत "जैसा राजा तैसी प्रजा",  असं म्हतात पण तेच लोकशाहीत "जैसी प्रजा तैसा राजा" असा कारभार चालतो. तो तसाच चालतो जसा तुम्हाला चालवायचा आहे किंवा चालवू द्यायचा आहे!!!!"
"कंपनी च्या प्रोजेक्ट साठी सुद्धा 'Retrospection Meeting' घेणारे तुम्ही आपल्या देशा बद्दल, आपण त्या साठी काय करतो, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काही वेगळं, नवीन करू शकतो का असं कुठलं ही आत्मपरीक्षण करत नाही!!!!...का??..का नाही करत???..त्याचे कोणी पैसे देत नाही म्हणून!!!!"
"परक्या देशात, परक्यान साठी, परक्यान बरोबर नेहमी मनात परके पणाची भावना ठेवून जगण्या पेक्षा आपल्याच देशाला आपलं मानून आणि बनवून, त्याच्या शीच नव्याने एक नातं जोडून राहिलास तर तेच परके लोक इथे येतील, आपल्या समृद्धीचा भाग व्हायला, तिला उपभोगायला!!!..असा नाही वाटत  तुला!!!"
"नुसती मंदिरे, आणि मस्जीदी बांधून भूमी पवित्र होत नसते."
"मंदिर देवाच आहे, म्हणून त्यात पवित्र, शांत वाटत नाही, ते सांभाळणारे, व्यवस्थित ठेवणारे, झाडू वाले व इतर सफाई कामगार त्याचं पावित्र्य टिकवतात, सांभाळतात!!!!!... एखादे घाण झालेल्या मंदिरात तुम्ही देवाला ही एकट सोडून जाल.................त्यात माझी किंवा देशाची काय बात!!!!"
तिथे उभं राहण असह्य झालं होत, माझ्यात सत्य पचवण्याची सोडा पण ऐकायची ही क्षमता राहिली नाही, हे त्या दिवशी मला कळलं आणि लाज वाटली. मला अस्वस्थ पाहून तीच थांबली, शेवटी आईच ती, मुलाला किती ही बोलली तरी शेवटी प्रेम आणि आशीर्वादाच देणार.
माझ्या तोंडातून शब्द फुटत न्हवते, कसं-बसं बळ आणून मी म्हणालो." मी निघतो........." आणि पाठ फिरवून सरळ विमानच्या दिशेने वेगाने निघालो..........
तिचा मागून आवाज येत होता,"अरे, बघ तुझ्या सारखे अजून आहेत, त्यांच्या जोडीने आपण बदल घडवू, अरे!! आई आई असते रे, आणि घर घर असतं....आपलं आवडलं नाही म्हून सोडून नाही जात असं.......ऐक..ऐक हे बघ.............."
मी तडक विमान जाऊन बसलो आणि कान बंद करून घेतले......विमाच यंत्रांचा आवाज सुरु झाला आणि त्यात तिची ती केविलवाणी हाक दाबून चिरडली गेली............
विमान धावपट्टी च्या दिशेने निघाले आणि एकदम वेग घेऊन अचानक दोन क्षणात जमिनीवर उचलल्या गेले. आपल्या मुलाला भरारी देण्यासाठी तिने आपल्याच छातीची धावपट्टी केली होती.
तुटलेल्या, जखमी झालेल्या त्या काळजातून शेवटची ऐकू आलेली पुसटशी वाक्य अजून ही कानात घुमतात
"गेला!!! आपल्या आई ला पोरकं करून.......!!!!!!"


Tuesday, January 29, 2013

माझे असेल ना!!

पावसाला अनुभवताना...
एक ओली आठवण तरी...
माझी होईल ना!!!!!

प्रेमाने लाजशील जेव्हा अशी....
एक नजर ती...
माझी असेल ना!!!

अंग शहारेल जेव्हा तुझे....
एक स्पर्श कधी तरी तो.....
माझा असेल ना!!!

असंख्य स्वप्नांन मध्ये तुझ्या.....
एक स्वप्न अपूर्ण....
माझे असेल ना!!!

बहरलेल्या बागेत तुझ्या ...
एक हिरमुसलेली कळी.....
माझ्या प्रेमाची असेल ना!!!!

तुझ्या रंगवलेल्या चित्रात...
एका रंगाची छटा ..
माझी असेल ना!!

तुझे सप्तरंगी इंद्रधानुश रेखाटणारे....
एक तरी आकाश..
माझे असेल ना!!!!!!

तुझ्या मनाच्या सागरात....
एकच मोती खोलवर....
माझा असेल ना!!!

तुझ्या निखळ हास्याला फुलवणारे, जागवणारे...
एक तरी कारण....
माझे असेल ना!!!!!

अश्रू ओघळले तुझे कधी..
एक थेंब त्यात नेहमी....
माझ्यासाठी असेल ना!!!

सूखोत्सवी तुझ्या घरात...
एक छोटा, दुःखाचा कोपरा..
माझा असेल ना!!!!

एकांतात एखाद्या तरी....
हाती एक हाथ कधी...
माझा असेल ना!!!!

दोन क्षण ते तुझ्या प्रीतीचे...आयुष्य व्यापूनी  गेले!!!
तुझ्या लेखी तेवढे तरी ...माझे असेल ना!!!!!
तुझ्या लेखी तेवढे तरी ...माझे असेल ना!!!!

Thursday, January 24, 2013

ती हसली....

ती हसली
मेघा बरसली...

ती हसली
धरा बहरली....

ती हसली
पालवी फुटली....

ती हसली....
कळी उमलली!!!

ती हसली
कोडी उलगडली...

ती हसली
दुखः सरली...

ती हसली
सुखं सजली......

ती हसली
डोळे पाणावले....

ती हसली
रंग उधळले...

ती हसली
मोती विखुरले...

ती हसली
मन मोहरले....

ती हसली
अंग शहारले....

ती हसली मज .....प्रीत उमगली!!!!
ती हसली मज .....प्रीत उमगली!!!!

Wednesday, January 23, 2013

तेरी एक हसी...

तेरी हसी से जब भी गूंजी है जिंदगी...
ख़ुशी का एहसास तभी दिलाइ है जिंदगी!!!
खामोश, तन्हा जिंदगी ने जब भी रुलाया है...
तेरी हसी की गूंज ने ही फिर हसाया है!!!!!

अमावस की रात जगमगाते जुगनू की तरह।।
गर्मियों में बहने वाली ठंडी पुरवाईयो की तरह!!!
बरसात में मिट्टी की सौंधी खुसबू की तरह।।
सागर के लेहेराते, बलखाते मौजो की तरह!!!

जब जब ये सारा महसूस किया है।।
हसी का तेरे मुझे एहसास हुआ है!!!

काले घने बादलों को चीरती उस किरन की तरह।
बे मौसम अचानक गिरती हुई बरसात की तरह!!!
आसमान में चमकने वाली उस बिजली की तरह।
बारिश ने खिलाई हुई हरियाली की तरह!!!!

मौसम को जब भी यु मुस्कुराते हुए देखा।।
तुझे ही उन सब में मुस्कुराते हुए पाया।।

तार से निकली किसी सुरीली सरगम की धुन ।।।
बजते हुए किसी मासूम पायल की छुन-छुन !!!!!
वीरान पहाड़ों से गिरते झरने की गुंजन।
या छत पर बजते हुए बारिश के जलतरन !!

जब भी सुनी ये आवाज़े कहीं।।
तू हस रही थी शायद वहीं कही।

मंजर ये सारे आज भी वैसे ही हस्ते है
सुनने को खाली ये आवाज़े रह गयी है
हस्ते हुए तुझे आज देखता ही कहाँ हूँ!!!
हसी की गूंज तेरी इन में ही ढूँढता हूँ!!!

क्या कभी लौटेगी तुम्हारी वो हसी।
कैसे मिलेगी उसे जिंदगी नयी!!
खामोश, तन्हा, वीराने आज भी रुलाते है...
तेरी उस हसी की तलाश में आज भी भटकते है !!!!!
तेरी उस हसी की तलाश में आज भी भटकते है !!!!!

Friday, December 28, 2012

शाम

एक सुनी ठंडी शाम को
निकला उन पुरानी  पगडंडियों पर
कुछ हसीन पलों को दोबारा जीने
और कुछ जिन्दा पलों को दफनाने!!!

एक खुले मैदान से गुजरते हुए देखा
जिंदगी बेफिक्र होकर खेल रही थी
किसी चीज़ की परवा किये बिना
जीने का लुफ्त उठा रही थी!!!

लौट रहे थे सभी यहाँ
में न जाने कहाँ चला जा रहा था
मंजिल का कोई ठिकाना नहीं
सफ़र में ही मंजिल तलाश रहा था!!!!

सूरज क्षितिज के छोर से झांक रहा था
दिन की कुछ आखरी किरनो को फैला रहा था
भटके हुए पंछियों को शायद
उनके घर का रास्ता दिखा रहा था!!!

कुछ हासील कर, कुछ खो कर लौट रहे थे
कुछ हार तो कुछ जीत कर!!!!
चेहेक कर अपनी कहानी सुना रहे थे
घोसले को ही अपनी मंजिल बता रहे थे

सोचा मेरा भी एक ऐसा घोसला हो
मेरा शोर भी जिनके लिए संगीत हो
हार-जीत के मायनो से परे
जहाँ सिर्फ मेरे लौटने का जश्न हो!!!

सूरज अपनी रौशनी, चाँद सितारों को दे गया
अँधेरे में भी अपनी एक किरन छोड़ गया
मेरे अंधेरों के ऐसे ही उजाले का मगर
मै तो सूरज धुंडने निकला था!!!!
मै तो सूरज धुंडने निकला था!!!!