Tuesday, February 5, 2013

थोडं-थोडंक!!

सुख थोड,  दुःख थोड
रडू थोड, हसू थोड.
गोळा बेरीज करिता शेवटी...
राहिल का काही आपल्या हाती ???

स्वप्नं माझे.. स्वप्नं तुझे..
थोडे पूर्ण, बरेच अपूर्ण!!!
मन वेडे तरी ही स्वप्न पाहे..
थोडे वास्तव , थोडे रंजन!!

मौनात सारे , शब्दात थोडे
डोळ्यात थोडे, ह्रिदयात केवढे!!!
भाव असे हे आपल्या मनातले....
न बोलता ही थोडे कळले असते........!!!

थोडं तुझं, थोडं माझं..
एकत्र करून जोडू सारं!!
साकारू छोटुसं विश्व आपूलं
थोडं तुझं, थोडं माझं..

थोडं बघूया निस्वार्थ होऊन..
थोडं दुसऱ्यासाठी ही आपण जगून...
मिळेल थोडी शांतता, थोडंसं समाधान!
जगण्यास थोडी वेगळी दिशा!!

थोडं कमी, थोडं जास्ती
नेमकं, बरोबर असं काहीच नाही!!!!
थोडं अजून हवय म्हणून...
जगायचच थोडं जातं राहून !!!!!
जगायचच थोडं जातं राहून !!!!!

3 comments:

Prachi Karkhanis said...

khup chhan...its very thought provoking...

Vids said...

WOW!!! stupendous work...khoopach chaan Ash..loved it :)

Unknown said...

lovely msg