Wednesday, March 27, 2013

प्रेम

Lighter चा खटकन आवाज झाला आणि त्याच्या प्रकाशाने आमच्यामधलं अंतर एकदम कमी झालं. hotel च्या waiter  ने मग आमच्या समोर ठेवलेली मेणबत्ती पेटवली आणि निघून गेला. कुठलंही नवीन restaurant दिसलं की तिथे जाऊन एकदा तिकडचं जेवण चाखायचं हा आम्हाला लागलेला नवीन पण खर्चिक छंद होता. आम्ही चांगले मित्र होतोच, हो!! म्हणजे तशी ती special  मैत्रीण होती किंवा आहे पण प्रेम वगैरे नव्हतं, किंवा ते असलं तरी आम्ही एकमेकांना तसं काही जाणवू दिलं नव्हतं. कदाचित जाणवू न देता जे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची, असण्याची जाणीव करून देतं त्यालाच प्रेम म्हणत असावेत!!!!!!!


candle light मध्ये आम्ही दोघं थोडे अस्वस्थ झालो होतो खरे, पण दोघांनाही या गोष्टीची कल्पना नसल्याचं  कळल्यानंतर एकच हशा पिकला आणि आम्ही relax झालो. मला ती आवडायची यात काही वाद नव्हता पण ते प्रेम आहे कि नाही, तिला काय वाटत असेल, नुसतंच आकर्षण नाही कश्यावरून असे काही मुलभूत प्रश्न मला पडले होते. एक गोष्ट नक्की होती कि मला ती मैत्री आणि त्या नात्यामधली  मजा, तो गोडवा टिकवायचा होता. बघू पुढे काय होतंय असं म्हणत कदाचित दोघेही ते पुढे ढकलत होतो!!!!….



waiter ने menu card आणून दिलं आणि नेहमीप्रमाणे, order ठरवण्याचं आणि देण्याचं काम माझं असल्यामुळे मी त्यात डोकं घातलं. सगळं ठरवून order दिली आणि आम्ही निवांत गप्पा मारायला लागलो. आठवड्याच्या घडामोडींची उजळणी सुरु झाली. मला नेहमी आश्चर्य वाटायचं कि तिच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक निराळाच दृष्टीको असायचा. मी ना कधी ते साधेपण समजू शकलो ना  कधी ते स्वतःमध्ये आणू शकलो. पण तिचं सगळं अगदी सोपं, साधं, सरळ, नितळ, स्वछ होतं…!!!!!

तिच्या सांगण्याच्या उत्साहाला उधाण आलं कि मला फार गंमत वाटायची आणि अशार्याही, आश्चर्य याचं कि कुठल्याही छोट्या गोष्टीमधले बारकावे, संवेदना तिला बरोबर कळायच्या,……  स्पर्श करायच्या!!!! 



त्या मिण-मिणत्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून गेला होता. माझं लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेलं, आणि त्याक्षणी पहिल्यांदा कदाचित मला त्या असलेल्या, लपलेल्या प्रेमाची जाणीव झाली. ते डोळे प्रकाश कमी झाला कि चमकत होतेम्हणजे त्यातली ती चमक अंधारातही एखाद्या ताऱ्याप्रमाणे लक्ष वेधून घेणारी होती. बोलताना ते भाव पहिले डोळ्यात आणि मग शब्दात यायचे. ती स्वप्नं, ते सत्य सगळं एकाच त्या डोळ्यांमधून वेग-वेगळ्या भावांतून व्यक्त होत होतं. गंमत सांगताना, आपली खोडी सांगताना ते मिश्किल व्हायचे, परत कुठली भावनाप्रधान गोष्ट सांगताना भावूक…. . ते भावनांचे विश्व-रूप दर्शनच होतेआणि मी त्या विश्वात हळू हळू रमत होतो आणि हरवतही!!!!. ते मध्येच एखादी गोष्ट सांगताना झुकायचे, लाजायचे. लाजरे भाव त्या डोळ्यांना इतके छान दिसतात याची कल्पनाच नव्हती केली मी कधी!!!आपल्या स्पर्शाने लाजतील का ते डोळे अशी कल्पना माझ्या मनात आली आणि स्वतःचं हसू आलं!!!!!……

मला वाटलं हीच का ती मुलगी, जिच्याबरोबर इतक्या वेळा फिरलो पण याकडे कधी लक्ष का नाही गेलं? कदाचित बाहेरच्या लख्ख प्रकाशात त्यांच्याकडे बघणंच झालं नाही!!!इतकी दुसरी प्रलोभनं लक्ष वेधून घेतात की, आपल्या जवळ वढा खजिना दडला आहे हे कधी बघितलच नाही मी!!

त्या मंद प्रकाशात दुसरं काहीच बघू न शकणारे माझे डोळे आज फक्त हेच बघत होते!!!

मला पूर्णपणे त्या प्रेमाची जाणीव होत होती. माझ्या स्वतः बद्दल असलेल्या शंका दूर होत होत्या…. मला त्या डोळ्यांना नेहमी असंच बोलकं ठेवायचं होत. त्यात ती स्वप्नं  तशीच जगवायची होती, किंबहुना नवीन नवीन स्वप्नं त्यांनी निर्धास्तपणे पहावीत  असा विश्वास द्यायचा होता. कुठली मोलाची, महत्वाची गोष्ट सांगताना त्यात माझ्यासाठी असलेला विश्वास दाटून यायचा. स्वतःचा अश्यावेळेस मला पहिल्यांदा उगाच अभिमान वाटला. कोणीतरी समोर आपल्यावर एवढा विश्वास ठेवतं हे खूप सुखावणारं होतं. मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. 


ती काहीतरी विचारात होती आणि मी काहीच बोलत न्हवतो, लक्ष हरवून बसलो होतो(माझं लक्ष भलतीकडेच होतं) किंवा एक नवीन लक्ष डोळ्यासमोर तयार होत होतं. तिने पटकन माझ्या हातावर हा  ठेवला आणि मला म्हणाली "helloooo!!!… कुठे लक्ष आहे!!कसला विचार चालू आहे डोक्यात…….", तिच्या स्पर्शात अजून हरवून गेलो आणि होकार द्यायच्याऐवजी तो हा अलगद हातातच धरला!!!!!

एका सेकंदात भानावर आलो, आपण काय करतोय हे लक्षात येताच, हात सोडून, ते संभाषण पुढे नेलं. तिच्या लक्षात आलं असेल का, तिला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे तेमी थोडा अस्वस्थ झालो. मन म्हणालं कठीण आहे कळणएक सेकंद फक्त धरला होता!!!!

मी परत तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागलो. या वेळेस ते डोळे मात्र झुकेलेल होते, थोडे लाजरे, कसलीशी वाट बघत होते कि काय अस वाटत होतं. मी आपलं उगाच इकडचे तिकडचे विषय आणि बाष्कळ विनोद करत होतो…… त्या डोळ्यांवरून नजर हटत नव्हती, पण आता ते झुकलेलेच होते, मी तिच्याकडे बघत होतो हे बहुदा तिला कळतंय अस वाटत होतं, तीच्या ओठांवर एका कळीप्रमाणे हळू हळू मध्येच हसू फुलत होतं. तिलाहि कदाचित त्या प्रेमाची जाणीव होत होती. हीच ती आणि हेच ते जे आपल्याला हवंय हे कळून चुकलं होतं.



तेवढ्यात तिचा mobile वाजला, ती उठून बाहेर जाण्यासाठी वळाली तोच मागे असलेल्या waiter चा धक्का लागला आणि त्याच्या हातातलं जेवण खाली जमिनीवर पडलं आणि प्लेट्स फुटल्याचा आवाज झाला. त्या धक्क्याने तिच्या हातातली तिची छडी खाली पडली. तिला काहीच कळेना, खाली काचा लागतील म्हणून ती बाजूला होताच, तिचा तोल गेला आणि मी एकदम उठून लगेच तिचा हात धरला. तिची पडलेली काठी उचलून तिच्या हातात दिली. ती सावर्तास सावरताच मी हात सोडला. ती अजून थोडी घाबरली होती, माझ्या दिशेचा अंदाज घेऊन शून्यात बघत होती. तिचा हात अजूनही माझा हात शोधत होता. मी थोडं घाबरतच परत माझा हात तिच्या हातात दिला, तिने एकदम पकड घट्ट केली. मला म्हणाली," हात का सोडलास…… माझा!!दोन्ही वेळा!!!!… ??".
मी चपापलो, तिला कळलं होतं ……. आपण हात धरला होता ते, "मला तुला फक्त आधार नाही तुझी साथ द्यायची आहे!!!!!" मी म्हणालो.


ती म्हणाली, "मगमाझ्यावर आणि माझ्या प्रेमावर दोघांवरही  विश्वास नव्हता नंतुझं प्रेम कळणार नाही अस वाटलं होतं ना!!!".मी नि:शब्द होऊन मान हलवत नाही म्हणत होतो तेवढ्यात तीच  म्हणाली." बावळट!!!!मान काय हलवतोयस "नाही" म्हणूननाही म्हण….तुला माहितीये ना मला दिसत नाही!!!!"…… अस म्हणून आपला दुसऱ्या हातातली काठी सोडून तो हि हाथ माझ्या हातात दिला ……...….आणि जे मला किंवा तिला बोलताही आलं नसतं ते.. ते सगळं सगळं तिचे डोळे माझ्याशी बोलत राहिले.होती!!!!!

[[[[नजरेतून एवढी स्पष्ट व सुंदररित्या व्यक्त होणारी प्रेमासारखी दुसरी भावना नसूनही, "प्रेम आंधळ असतं" असं का म्हणतात असा विचार मी करू लागलो!!!!!!!!]]]]

Thursday, March 14, 2013

तेरे रंगों में..

तेरे रंगों में रंगीन है नज़ारें
तेरे रंगों में रंगीन ये फ़िजाए
तेरे रंग लेके बना है इन्द्रधनुष
तेरे रंगाए हुए नीले असमान में।।

तेरे रंग में रंगीन झरोखें
तेरे रंग में रंगी है दीवारें
तेरे रंग से खिली मेरी बगिया
तेरे रंग से सजा है मेरा आँगन

तेरे रंग में रंगे है मेरे सपने
तेरे ही रंग में रंगा हर सच
तेरे रंग से दमकती है खुशियाँ
तेरे रंग से धुन्दला जाते है दुख

तेरे रंग में रंगीन है दिन
तेरे ही रंग में रंगीन शाम!!!
तेरे रंगों में रंगे है रिश्ते
तेरे रंग में रंगी मुस्कान

तेरे रंगों से खिलती है रंगोली
तेरे रंगों में रंगी है होली
तेरे रंग से रोशन दिवाली
तेरे रंग में रंगी है जिंदगी

Wednesday, March 13, 2013

तो क्षण….

तुझा चेहरा ओंजळीत…
उतरला चंद्र अंगणात
स्पर्शास आतुर झालेले
लाजरे डोळे ते झुकलेले

केस तुझे ते विखुरलेले
प्रेमाचे रहस्य लपवलेले
प्रेमाच्या या नवीन जाणीवा….
भान हरवून गेलेले!!!!

माझ्या प्रीतीचे हसू
तुझ्या गाली थोडे ओघळलेले
अबोल प्रेमाचे शब्द जसे
कापऱ्या ओठांनी शिवलेले

गंध तुझा दर्वळता
श्वासांचे आवेग वाढलेले
मनी प्रेम ओथंबलेले
रोम रोमातुनी जाणवत असलेले

समर्पणाची चाहूल लागता
ह्रिदय ही बेताल झालेले
पहिला स्पर्श तो होताच
अंग माझे ही शहारलेले

प्रेम मनातून वाहून
स्पर्शात तुझ्या मिसळेले
मीठीत एक-मेकांच्या मग
तन-मन आपले विरघळलेले

Monday, March 11, 2013

तुमसे ही....


एक हसी के लिए
यहाँ वहां घूम रहे थे!!
तुम्हारा मिलना ही काफी था!!!

एक हसी के लिए
अपने आंसू छुपा रहे थे
तुम्हारा मुस्कुराना ही काफी था!!!!

एक हसी के लिए
अपने ज़खमो को सेह रहे थे
तुम्हारा मरहम ही काफी था!!!

एक हसी के लिए
झूठे बहाने ढूँढ रहे थे
तुम्हारा एक सच ही काफी था!!!!

एक हसी के लिए
अपने आप को संभाले हुए थे
तुम्हारा हाथ थामना ही काफी था!!!!

एक हसी के लिए
कई राहें आजमाई थी
तुम्हारा साथ चलना ही काफी था!!!!!

एक हसी के लिए
परायों को अपना बनाया
तुम्हारा गले लगाना ही काफी था

एक हसी खिलने के लिए
कई बहारें लौट गयी
तुम्हारा आना ही काफी थी!!!!

एक हसी के लिए
अपने आप से झगड़ रहे थे
तुम्हारा प्यार ही काफी था!!!


Monday, March 4, 2013

बम विस्फोट

कुछ लोगों ने लायी मौत
जिंदगी के बाज़ार में
सस्ती जिंदगी बिक गयी
मौत के ईस सौदे में.......

जले हाथ, जले पैर
जले तन, जले मन
जले न जाने कितने घर
और जल गए कितने अरमान!!!!

कहीं ढूंढती , सहमी आँखें
कहीं अपाहिच हुई जिंदगी
कहीं तिनका-तिनका हुए थे सपने
कहीं बिख्ररी हुई आशायें

कहीं थैले में से तुटे खिलौने!!
कहीं रोती, बिलगती आवाज़े
कहीं ममता पड़ी थी लहूलुहान
कहीं बेजान हाथों ने पकड़ी थी नन्ही जान!!!

हिन्दू मरे या मुसलमान
अपने मरे या पराये
धर्मनिर्पेक्ष थी तो सिर्फ वो मौत
जिसने किया ना कोई भेद!!!!!!!

भगत सिंग के धमाके से जागे थे लोग
जागी थी बेहेरी "परायी" सरकार!!!
धमाके के आदि लोग यहाँ!!!!
और उनसे भी बेहेरी "अपनी" सरकार