पावसाला अनुभवताना...
एक ओली आठवण तरी...
माझी होईल ना!!!!!
प्रेमाने लाजशील जेव्हा अशी....
एक नजर ती...
माझी असेल ना!!!
अंग शहारेल जेव्हा तुझे....
एक स्पर्श कधी तरी तो.....
माझा असेल ना!!!
असंख्य स्वप्नांन मध्ये तुझ्या.....
एक स्वप्न अपूर्ण....
माझे असेल ना!!!
बहरलेल्या बागेत तुझ्या ...
एक हिरमुसलेली कळी.....
माझ्या प्रेमाची असेल ना!!!!
तुझ्या रंगवलेल्या चित्रात...
एका रंगाची छटा ..
माझी असेल ना!!
तुझे सप्तरंगी इंद्रधानुश रेखाटणारे....
एक तरी आकाश..
माझे असेल ना!!!!!!
तुझ्या मनाच्या सागरात....
एकच मोती खोलवर....
माझा असेल ना!!!
तुझ्या निखळ हास्याला फुलवणारे, जागवणारे...
एक तरी कारण....
माझे असेल ना!!!!!
अश्रू ओघळले तुझे कधी..
एक थेंब त्यात नेहमी....
माझ्यासाठी असेल ना!!!
सूखोत्सवी तुझ्या घरात...
एक छोटा, दुःखाचा कोपरा..
माझा असेल ना!!!!
एकांतात एखाद्या तरी....
हाती एक हाथ कधी...
माझा असेल ना!!!!
दोन क्षण ते तुझ्या प्रीतीचे...आयुष्य व्यापूनी गेले!!!
तुझ्या लेखी तेवढे तरी ...माझे असेल ना!!!!!
तुझ्या लेखी तेवढे तरी ...माझे असेल ना!!!!
एक ओली आठवण तरी...
माझी होईल ना!!!!!
प्रेमाने लाजशील जेव्हा अशी....
एक नजर ती...
माझी असेल ना!!!
अंग शहारेल जेव्हा तुझे....
एक स्पर्श कधी तरी तो.....
माझा असेल ना!!!
असंख्य स्वप्नांन मध्ये तुझ्या.....
एक स्वप्न अपूर्ण....
माझे असेल ना!!!
बहरलेल्या बागेत तुझ्या ...
एक हिरमुसलेली कळी.....
माझ्या प्रेमाची असेल ना!!!!
तुझ्या रंगवलेल्या चित्रात...
एका रंगाची छटा ..
माझी असेल ना!!
तुझे सप्तरंगी इंद्रधानुश रेखाटणारे....
एक तरी आकाश..
माझे असेल ना!!!!!!
तुझ्या मनाच्या सागरात....
एकच मोती खोलवर....
माझा असेल ना!!!
तुझ्या निखळ हास्याला फुलवणारे, जागवणारे...
एक तरी कारण....
माझे असेल ना!!!!!
अश्रू ओघळले तुझे कधी..
एक थेंब त्यात नेहमी....
माझ्यासाठी असेल ना!!!
सूखोत्सवी तुझ्या घरात...
एक छोटा, दुःखाचा कोपरा..
माझा असेल ना!!!!
एकांतात एखाद्या तरी....
हाती एक हाथ कधी...
माझा असेल ना!!!!
दोन क्षण ते तुझ्या प्रीतीचे...आयुष्य व्यापूनी गेले!!!
तुझ्या लेखी तेवढे तरी ...माझे असेल ना!!!!!
तुझ्या लेखी तेवढे तरी ...माझे असेल ना!!!!
No comments:
Post a Comment