आग-गाडी किंवा रेल्वे शी नाळ जन्म झाल्या झाल्या जोडल्या गेली, म्हणजे आई शी जोडलेली डॉक्टर ने कापली आणि लगेच रेल्वे शी जोडली, म्हंटलं, तरी चालेल. नाही नाही…!!!!!! गाडीत किंवा Train मध्ये वगेरे जन्माला आलो नाही पण मुंबईत असल्यामुळे, रेल्वे स्टेशन लागून असलेल्या इस्पितळात जन्म झाला. माझी पहिली आरोळी आणि सकाळच्या पहिल्या fast train ची भूपाळी, असे एकत्रित स्वर आई च्या कानी पडले असावेत. तिथे कुठल्या ही गाडी ने जोरात भोंगा वाजवला कि सगळे नवजात शिशु त्याचं प्रतीउत्तर म्हणून भोंगा काढायचे. आता मागे बघता, ते इस्पितळ,कदाचित होणाऱ्या आई ची किंवा बाळाची नाही तर त्या बाळाच्या बापाची सोय बघून च ठरत असे, नाही तर रेल्वे स्टेशनच्या बाजूला Maternity home कोणी का काढावं!!!!!!
असो……
पुढे मग थोडा मोठा झालो, चालता वगेरे यायला लागल्या वर आई ने त्या भोंग्याच्या बोलवीत्या धन्याची म्हणजे खर्या-खुर्या गाडी शी ओळख व्हावी म्हणून स्टेशन वर नेले. बाकी च्या शहरात मुलांना बागेत नेत असतील पण मुंबईतल्या जिजाऊ आपल्या शिवबांना पुढे असलेल्या train मधल्या आपल्या स्वतंत्र जागेच्या लढ्यासाठी तयार करायला स्टेशन वर नेत. मी हि असाच त्या अनेकान पेकी एक. क्रमांक ४ च्या फलाटावरून आई मला विरुध्द दिशे ला "ती बघ तिकडून गाडी येणार……३ नंबर वरून, त्यातून बाबा येणार आपले!!!", असं सांगत होती आणि मी सर्व लक्ष त्या दिशेला केंद्रित केले असताना आमच्या लागून असलेल्या म्हणजे ४ नंबर track वरून एक express मोठ्याने भोंगा वाजवीत गेली आणि मी घाबरून आईच्या दोन पायात डोकं खुपसून रडायला लागलो. आई ने बरच समजावलं कि ती कशी लांब आहे आणि ती platform वर नाही येत वगेरे वगेरे पण फारसा उपयोग झाला नाही. बाबा आले आणि मी रडतच त्यांचे स्वागत केले आणि नंतर एक cadbury आणि श्रीखंडाच्या गोळ्या कमावून घरी परतलो. काही दिवस मग नियामित पणे स्टेशन वर जात राहिल्या मुळे, गाड्यांशी मैत्री वाढायला लागली. त्यांनी आता मला घाबरवणं सोडलं होतं.
माझ्या काही आवडत्या ठिकाणापेकी, एक ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन !!!!!! मी तासान तास गाड्या बघत बसू शकतो, त्या समुद्राच्या लाटान प्रमाणे एका मागून एक येतच राहतात. प्रत्येक लाट जशी एका समुद्रातून जन्माला आलेली असली, तरी वेगळी, अनोखी, त्याच प्रमाणे त्या गाड्या ही.
ती प्रत्येक लाट स्वतः मध्ये एक स्वंतंत्र सागर घेऊन धावते. सागर… लोकांचा, त्यांच्या भावनांचा, विचारांचा, सुख-दुखांचा, आशा-निराशांचा, अपेक्षांचा!!!!………
या धावत्या विश्वाचा मी कदाचित एकमेव स्थिर, अचल असा श्रोता होतो. ते प्रत्येक धावतं विश्व माझ्या समोर भरायचं आणि रिकामं ही व्हायचं!!!!
एकदा असाच माणसे निरखून कंटाळ आला म्हणून मी गाड्यांना निरखून पाहू लागलो. त्या ही भरपूर काही बोलून जायच्या. माणसांना घेऊन जाता-जाता त्या हि माणसा प्रमाणे हाव-भाव दाखवायला लागल्या होत्या. हे माझं निरक्षण होतं की मी गाड्यांना समजायला लागलो होतो, ते नाही माहित!!!!………
गाड्यांच्या पण तर्हा असतात……… कुठली जलद गाडी किंवा जिला fast train म्हणवं तिला निरखून बघितल्या वर असं लक्षात येतं कि ति वेगळ्या च तोऱ्यात असते, स्वतःच्या गती चा जणू गर्व असतो, भरपूर मोठा आवाज आणि धूळ उडवीत ती स्टेशन वरून न थांबता जाते. तिला बघून, आपण यात असतो तर लवकर पहूचलो असतो अशी दुखी जाणीव तुमच्या चेहर्यावर बघितल्या शिवाय तिला बरं नाही वाटत. ती तिच्या स्वतः कडे तुमचं लक्षं वेधून घेतेच. बघत नसाल तर भोंगा वाजवते!!!!!… लहान मुल कसं रडून तुमचं लक्षं वेधून घेईल अगदी तसं.
तश्या सगळ्याच जलद गाड्या अश्या असतात असं ही नाही. तुम्ही कर्जत किंवा कसाराला जाणऱ्या किंवा येणाऱ्या गाड्या बघीतल्या की त्या एकाद्या खुप कष्ट करून मग सुखाचे दिवस बघत असलेल्या माणसां सारख्या भासतात. कसारा ते कल्याण धीमी गती ने झालेला खडतर प्रवास करून अचानक वाटेतील सगळे ऱ्होडे संपल्या वर माणूस कसा प्रगती शील वेग घेतो तश्या या गाड्या वेग घेतात. त्यांना त्यांच्या या वेगाचा अभिमान नसतो, माज पण नसतो, पण झालेल्या कष्टाची जाणीव असते. त्या मोठ्याने भोंगे वगेरे वाजवीत नाही. अगदी गरज पडली तर "मी जाते आहे" ह्याची फक्त वर्दी देऊन निघून जातात. चुकून तुमच्या स्टेशन वर थांबल्या तर "हुस्स्स्स्स्श्ह" असा श्वास सोडतात. त्यांच्या प्रवासाला त्या स्वतः ही कधी कधी कंटालेल्या आहेत असं वाटत, कधी-कधी तर लहान मुलाला जबरदस्ती शाळेत ओढत नेत आहे असे आवाज काढतात. कधी तर खरच दमलेल्या हि असतात, "चला, गेलं मुलुंड…आता ठाणे"…… असे जसे काही माणसं दिवस ढकलतात तशी ह्या stations ढकलत पुढे जातात!!!!!!
कधी-कधी देव ही जलद गाड्यांची परीक्षा घेतो, कुठल्या fast train च्या नशिबी कधी slow track ही येतो आणि ती बिचारी धक्के खात-खात, आपल्या बरोबरीच्या गाड्यांना आपल्या पुढे जाताना बघत हळू-हळू सरकत असते. तिचा तो राग, ती तळमळ, वेग न घेता येण्याची विफलता स्टेशन मधून निघताना दिसते किंवा ऐकू ही येते…. यंत्रा चा मोठा आवाज करून वेग घेते कि काय असं दाखवीत, थोडी धुमसून, रागाचे भोंगे वाजवून ती परत हळू होते. तिची ती घुसमट चुकीच्या जागी आणि चुकीच्या परीस्थित सापडेल्या माणसा पेक्षा काही कमी नसते. तिच्या वाटेला आलेला आणि लाभलेला तो जणू अभी-शाप च असतो!!!!!
त्याच्या तुलनेत धीमी local आपल्या मर्यादेत असते, ती म्हणजे मध्यम वर्गीय माणसा सारखी खाली मान घालून आपलं काम चोख करत असते. तिला कसला हि अभिमान नसतो, न कसला हि न्यूनगंड. सर्व स्थानकान वर थांबून, त्यांना त्यांचा पुरेसा मान देऊन, ती पुढे जात असते. भर धाव ती फक्त दोन स्टेशन च्या मध्ये ते ही बरच अंतर असल्या शिवाय जात नाही. कुठला ही भेदभाव ती करत नाही…… तिच्यासाठी सर्व स्टेशन सारखे आणि सर्व प्रवासी ही. कधी तरी तिला वेग घेण्याची हुक्की येते आणि ती एकदम स्टेशन मध्ये शिरते जशी आता न थांबताच जाणार, पण ते सगळ तेवढ्या पुरतं असतं आपल्या आईच्या ओरडण्या सारखं आणि ती परत हळू होऊन नीट थांबून सगळ्यांना घेऊन मगच निघते. एक विलक्षण शोशिक पणा आणि सय्यम हा त्यांचा स्थायी भाव आहे. कोणा बद्दल राग नाही आणि कोन बद्दल प्रेम ही फार नाही. निष्काम कर्मयोग करत असतात या गाड्या……. !!!!!
कधी कधी तर दोन जलद गाड्या आजू-बाजूला उभ्या राहिल्या कि विचारपूस ही करतात. संध्याकळी असच ३ आणि ४ वर दोन जलद गाड्या एकत्र येउन थांबल्या आणि त्यांची कुजबुज कानी पडली!!!!
४ ची लगेच ३ वाली ला खवचट पणे म्हणाली, "काय आज उशीर कसा काय!!…. एव्हाना ठाणे पार करायला हवस न ग!!!"
३ ची लगेच बोलली," अग!!।कय सांगू…ती जळली पंजाब मेल!!!… दररोज उशीरा येते न दादर ला… मग मला थांबावं लागत न, ती पुढे जाई पर्यंत!!!……… तू सांग तुला कसा आज उशीर??"
४ ची लगेच बोलली." तुझी पंजाब मेल……तर माझी Udyan Express!!!……. कल्याण ला तब्बल दीड तास उशीरा आल्या बाई साहेब!!……. मग काय आमच्या मध्ये घुसल्या ……… आम्ही खोळंबलो……मान द्यावा लागतो ना ह्यांना!!!!"
३ ची गाडी , "अग!!… मी ऐकलं आहे वेगळा track बांधणार आहेत म्हणे आता त्यांच्या साठी!!!!… बर होईल बाई अस झालं तर…. आपला खोळंबा तरी नाही होणार!!…बर चल-चल मी पळते आधीच उशीर झाला आहे…रात्री car-shed ला भेटूच…Bye!!"
४ ची " हो हो!!...bye!!"
स्टेशन वर थांबलेले किंवा संध्याकाळी उतरलेले लोक सहज दृष्टीस पडतात, त्यांचे ते train च्या गर्दी ला कंटाळलेले चेहरे, तर त्याच गर्दीमुळे जवळ आलेले जोडपे, college च्या रंगेलेले आणि नंतर स्टेशन वर ही न संपलेल्या गप्पा गोष्टी करणारे मित्र-मैत्रिणी, तर त्यातून बाहेर पडून office politics वर चर्चा करणारे चाकरमाने. कोणी स्वःताची दुखः सोडून आलेला तर कोणी आपली सुख!!!……. कोणी उत्सुक, कोणी थकलेले, कोणी आपल्या लहान मुलाला बघून पुन्हा उत्साहित झालेले असे सर्वच!!!!……… एकदा असाच बघत असताना अचानक माझं लक्ष त्या थांबलेल्या गाडी कडे गेलं, ३ नंबर वर थांबलेली ती, सगळे प्रवासी आपल्या घरट्याच्या दिशेने चालत असताना, त्यांच्या कडे बघत होती!!!
सगळे आनंदी, अजून एक दिवस कारणी लावला, आणि आता आपल्याघरी आपल्या माणसां समवेत उरलेला दिवस मजेत जाणार या आनंदात. ती त्या track वर मला एकाकी भासली, ती बघत होती बघुदा कि कोणी तिच्या कडे वळून बघत आहे का, कोणी तिची जाण ठेवत आहे का?? पण कोणीच नाही सगळे आप-आपल्या दिशेने निघून गेले. तिने भोंगा वाजवून त्यांना साद ही घातली, पण ते लोक तो आपल्या साठी नाही असं समझून लांबच जात राहिले. हीरमुसली झाली ती, अगदी रडवेली, इतक्या कष्टाने जीवाचा आटा-पिटा करून ज्यांना त्यांच्या घरच्या दिशेने पहुचवते, ही माणसे आपल्याकडे वळून ही बघत नाहीत. पण तिच्या कडे थांबून, त्यावर वेळ घावायला ही वेळ न्हवता. जाता-जाता मी उगाच तिच्या कडे बघून हसलो तर ती एकदम हसली जणू विचारतून भानावर आली आणि पटकन वेग घेऊन निघून गेली.
मी त्या गाड्यान मधल्या आणि स्टेशन वरच्या गर्दीत माझा एकांतच शोधत होतो!!…… एवढे लोक आजू-बाजूला असताना ही आपला अंतःकरणातील आवाज बरोबर ऐकू यायच्या!!!!!……….पण त्या दिवशी अस वाटलं मी एकटाच तिकडे एकटा न्हवतो!!!… जणू ती गाडी हि एकटीच होती!!!!!!.…आणी कदाचित भरपूर……………उपेक्षितं ही!!!!
त्या दीवसा नंतर माझा माणसां कडे नाही पण निव्वळ वस्तून कडे बघण्याचा द्रीष्टीकोण ही बद्दलला!!!!!!!

1 comment:
समुद्राच्या लाटान प्रमाणे एका मागून एक येतच राहतात. प्रत्येक लाट जशी एका समुद्रातून जन्माला आलेली असली, तरी वेगळी, अनोखी, त्याच प्रमाणे त्या गाड्या ही.
ती प्रत्येक लाट स्वतः मध्ये एक स्वंतंत्र सागर घेऊन धावते. सागर… लोकांचा, त्यांच्या भावनांचा, विचारांचा, सुख-दुखांचा, आशा-निराशांचा, अपेक्षांचा!!!!………
या धावत्या विश्वाचा मी कदाचित एकमेव स्थिर, अचल असा श्रोता होतो. ते प्रत्येक धावतं विश्व माझ्या समोर भरायचं आणि रिकामं ही व्हायचं!!!! >>>>> हे भारीच जमलंय...मस्तच छान!! मुंबईच्या लोकांच्या शरीरातील धमनी किंवा शिर म्हणता येईल नाही रेल्वेला? माझा जन्मच रेल्वेत झाला ते पण तुझ्या भाषेतच सांगायचं झालं तर "मानी गाडीत" असं म्हणायला हरकत नाही. मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस! माझ्या आयुष्याशी आणि पर्यायाने भावविश्वाशी जोडलेली गाडी. नंतर प्रेमात पडल्यावर जोडीदाराची वाट बघत रेल्वे स्टेशन वर अभ्यास पण केलाय कित्येकदा... गाड्या बघण्याचं सुख मीही अनुभवलंय. म्हणूनच कदाचित वरचा परिच्छेद जास्त भावला. ज्यांच्या नशीबी हे धावतं जग आलं नाही त्यांना खरंतर आयुष्य म्हणजे काय हे कळणारच नाही कधी असं वाटतं. एक सुरेख आठवणींची तार छेडल्याबद्दल आभार...
Post a Comment