बघावं का आपण ही……असं एक पत्र लिहून??
कागदांचे गाल ही….गुलाबी रंगवून !!
माझ्या ओठांन मागे लपवलेलं ….
बघूया कोरऱ्या कागदावर उलगडलेलं !!
माझ्या अनंत प्रेमाला
शब्दांच्या सीमेत बांधलेलं!!!
तुझ्या मनातलं असेल जरी
तरीही माझ्या मनाने लिहिलेलं!!
तुझ्या पापण्यांच्या मागचे चित्र…
माझ्या शब्दांनी रंगवलेलं!!!
तुझ्या स्वप्नांच्या विश्वाला
माझ्या लेखणीने साकारलेलं!!
तुझ्या मौनाचे अर्थ
त्यात अचूक टिपलेलं !!
तु उगाच लाजावस म्हणून…
तुझ गुपित लिहिलेल!!
तुझ्या निरागस सौंदर्याचं…
ते प्रतिबिंब असेलेलं!!!
माझ्या शब्दांच्या स्पर्शानं…
तुला मोहरून टाकणारं!!!
बघावं का आपण ही……असं एक पत्र लिहून??
माझ्या जीवनाच्या कागदावर
तुझ्याच शब्दांनी लिहिलेलं!!
कागदांचे गाल ही….गुलाबी रंगवून !!
माझ्या ओठांन मागे लपवलेलं ….
बघूया कोरऱ्या कागदावर उलगडलेलं !!
माझ्या अनंत प्रेमाला
शब्दांच्या सीमेत बांधलेलं!!!
तुझ्या मनातलं असेल जरी
तरीही माझ्या मनाने लिहिलेलं!!
तुझ्या पापण्यांच्या मागचे चित्र…
माझ्या शब्दांनी रंगवलेलं!!!
तुझ्या स्वप्नांच्या विश्वाला
माझ्या लेखणीने साकारलेलं!!
तुझ्या मौनाचे अर्थ
त्यात अचूक टिपलेलं !!
तु उगाच लाजावस म्हणून…
तुझ गुपित लिहिलेल!!
तुझ्या निरागस सौंदर्याचं…
ते प्रतिबिंब असेलेलं!!!
माझ्या शब्दांच्या स्पर्शानं…
तुला मोहरून टाकणारं!!!
बघावं का आपण ही……असं एक पत्र लिहून??
माझ्या जीवनाच्या कागदावर
तुझ्याच शब्दांनी लिहिलेलं!!
1 comment:
Superb,, as always, beautiful :)
Post a Comment