Saturday, September 3, 2011

तू नसून असतेस.................

तू कधीच नसतेस आणी नसल्यामुळे नेहमीच असतेस!!
तरी तू माझ्या प्रत्येक क्षणात कशी काय असतेस!!

माझ्या यशात, माझ्या अपयशात
माझ्या हरण्यात, माझ्या जिंकण्यात!!
तू मला हवी तशी कशी काय वागतेस, बोलतेस, हसतेस...
कारण.....तू नसतेस आणी नसल्यामुळे नेहमीच असतेस!!

तुझं असणं महत्वाच असत
तुझं नसणं जीवघेणं!!!!
पण तरी तुझी उणीव असते आणी तू कधीच नसते!!!
म्हणूनच म्हणतो ....तू नसतेस आणी नसल्यामुळे नेहमीच असतेस!!

कधी तू माझ्या एकटेपणात असतेस,
तर कधी मला एकाकी पाडतेस
कधी तू सर्वत्र असतेस तर कधी साऱ्या गर्दीत ही नसतेस,
.तू कधीच नसतेस आणी नसल्यामुळे नेहमीच असतेस!!

तू अशी वागणार, तू तस बोलणार
तू यावर हसणार आणी तू यावर रागावणार
तुझं हसणं रडणं रागावून बोलणं...किंवा बोलून रागावणं!!!
पहिलेच माहित असतं मला सारं!!!

कारण या सर्वांचं एकाच असाव
तू नसून सुद्धा तुझं अस्तित्व जाणवणं!!!

तू नसल्या मुले असतेस का आहेस, म्हणून कधीच नसतेस.........................

5 comments:

Bala said...

Very touching.. mastach lihila aahes.. keep goin :)

Pappu said...

kaafi achha likha hai.....simple word lekin matlab kaafi gehra :)

yeh dil maange more ashish

Ashok said...

Khupach mast.....kaljala bhidli ekdum :)

Vids said...

Absolutely beautiful!! loved it a lot..keep it up!! looking fwd to many more of such lovely compositions :-)

Nils said...

So good....very nice.