एका सुट्टीच्या दुपारी माझ्या घराच्या खिडकीत बसून ऊन उतरण्याची वाट बघत होतो. एवढ्या रणरणत्या उन्ह्नात कुठे बाहेर पडायच, थोडं कमी झालं कि जाऊया असा विचार करत बाहेर बघत होतो. रस्त्या वर माणसे सूर्यच्या तेजा पासून कसे बसे स्वतःला वाचवत जात होती. सूर्याला दया कशी येत नाही असा विचार करत असतानाच अचानक सावली कशी व कुठून पडली म्हणून वर बघीतलं तर एक मोठा ढग सूर्य समोर आला होता. त्याच्या नुसत्या येण्याने रस्त्या वरचे लोक सुखावले होते.
मला त्या ढगाच कौतुक वाटल... वाटल की काय हिम्मत आहे या ढगा मध्ये, जमिनीवरच्या लोकांना, ज्यांना तो ओळखत नाही, ज्यांच्याशी कसलाच संबंध नाही, अश्या लोकांनसाठी स्वतः सूर्या समोर येऊन त्याचं सगळं तेज स्वतःवर घायचं, कोणा परक्या माणसांसाठी एवढी उष्णता आणि ताप सहन करण्याची काय गरज. या जगात जिथे आपली माणसं आपल्या लोकांनाच परके झाले आहेत तिथे हा ढग स्वतः जळत सूर्या पासून या परक्यांच रक्षण का करतो आहे. त्याला हि निस्वार्थ भावना कुठून आली, कोणी शिकवली. कदाचित ती उपजतच असेल कारण निस्वार्थपणा कोणी शिकवून येत नसतो तो असतो किंवा तो नसतोच.............
मला त्या ढगाचा खूप हेवा वाटला पण थोड्याच वेळात लक्षात आलं कि तो एकटा या लढ्यात शामिल नव्हता त्याच्या सारखे त्याचे खुप सारे सवंगडी होते जे नकळत आभाळावरच सूर्याच राज्य काबीज करत होते. सूर्य हरत होता आणि बघता बघता सर्व आकाश त्यांनी काबीज केले.
त्यांच्या या हिमती ला दाद आणि आपला पाठींबा दाखवत हवा ही त्यांच्या मादितीला आली. ती ही आता सैरा वैरा पळत होती. सर्व ठिकाणी जणू फुंकर घालात, आपण ही लढाई कशी जिंकतो आहे याचा डंका बडवत होती. ज्या सूर्या ला एकट्याने हरवणे शक्य नव्हते त्याला आता आघाडी उभारून हरवलं जात होत.
बघता बघता सगळं वातावरण बदलून गेलं, सूर्याने त्याचा पराभव स्वीकारला, तो हरला, त्याचा ताप कमी झाला किंबहुना कमी पडला आणि सगळी कडे ढगांच्या विजयाचा गारवा पसरला. ढग आपले साम्राज्य वाढवू लागले आणि शेवटी आपल्या विजयची आतिषबाजी म्हणून पावसाचे बाण सोडू लागले.
या विजयी सलामीत सगळी धरा चिंब ओली झाली, ती तर स्वतःच या तेजामुळे रुष्ट, कोरडी आणि निरुस्ताही झाली होती. पाऊसाने तिला नुसताच पाण्याचा ओलावा नव्हे तर जणू तिला भावनिक ओलावा ही दिला. पृथ्वीला पुन्हा हसायला आणि फुलायला शिकवला. पहिल्या पावसाने जसे माणसे, प्राणी वगैरे खुश होतात तसेच त्यांना आनंदी बघून तिला एका आई प्रमाणे आनंद होतो, अश्याच अनेक कारणामुळे तिला आई म्हणत असावेत असा विचार चाटून गेला.
मला तेव्हा असा वाटलं आपण पण आपल्या आयुष्यातले पाउस शोधले पाहिजे, जपले पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे, त्यांना त्यांचं श्रेय आणि महत्त्व दिलं पाहिजे. कुठे तरी रोजच्या गडबडीत, धकाधकीत त्यांच्या कडे दुर्लक्ष करतो, गृहीत धरतो, आणि कधी तरी ते नाराज हून आपल्या वर प्रेमाचा, आपुलकीचा वर्षाव करत नाही आणि मग आपण कोरडे, निरुत्साही आणि निरर्थक होऊन राहतो. आपल्या आयुष्यातले हे पाउस आपल्यला जिवंतपणा देतात आणि तोच ओलावा आपण जपत नाही.... हे आपला दुर्दैव च म्हणव लागेल........
जेव्हा पाउस पहिल्यांदा येतो तेव्हा आपल्याला खूप हवा हवासा वाटतो अगदी आपल्या आयुष्यात आलेल्या नवीन व्यक्ती सारखा. तिची सोबत, सहवास हवा हवासा वाटतो तसाच पावसाचं आहे. पहिला पाउस खूप सुखावून जातो आणि नंतर सरता सरता त्याचा कंटाळा येतो... नकोसा होतो... तेव्हा जस आपण हे विसरतो कि तो आला होता तेव्हा त्याची किती आणि कशी गरज होती... गरज ओसरल्या वर लगेच कंटाळा येतो..
आपण माणसां बरोबर ही असच नाही का करत.... पण तरीही पुढच्या वेळेस पाउस यावा असा वाटत असत, तशी स्वार्थी अपेक्षा ही करत असतो परंतु गेलेली माणसं ही काही परत येत नाहीत.... पाउस नशीबाने तोच असतो पण माणसं कधीच नाही...
आपण आपल्या आयुष्यात एवढे गुंतलो आहे कि पाउस नीयमित यावा, हवा तेवढाच पडावा याची काळजी तर घेतच नाही पण हवी असेलेली माणसं टिकून ठेवून आपल्या आयुशातला ओलावा आणि हिरवळ जपण्यचा ही प्रयत्न करत नाही.
पावसाला आणि आपल्या माणसांना या दोघांना ही आपण हवं असलेलं लक्ष आणि महत्व देत नाही. जे न दिल्यामुळे आपण सध्या दोघांना ही मुकतो आहे. हीच ती वेळ हाच तो क्षण काही इथून पुढे तरी बदलायचा का????

9 comments:
I enjoyed every bit of it!!!!
Paus, Marathi and You really rock!!!
@प्राचि: टीप्पनि पण मराठीत लिही ;)
@आशिष: अप्रतिम. मला माझ्या लहानपणीची आठवण ज़ाली जेव्हा मी ढग पाहिले की पावसाची वाट पाहत बसायचो. :)
@dada: mast mast mast.......paus padun gelya var jasa maticha sugandh yeto na aani aplyala matichi aathavan hote.....tasach kahisa tujhya blog vachlya var aapan kiti aani kuthe chukto te kalale... :)...(mala marathit nahi type karta yet....wanted to but don't know how to)
good one ashish.....sachin nantarche tuze blogs mala farach mechanical vaatle ....ratib ghatlyasarkhe pan ha kharach khup chhan aahe.....more because here you r talking only about your thoughts some how in others I got feeling of you imposing it on others....last para is interospective.....one should think while leaving closed ones to get close to some other person.......good work....lihit raha ASACH
nice post Ashish..he khar ahe ki pavasacha nantar nantar kantala yeto....pan aatun manatun apan kuthetari Shravan yayachi vaat baghat asato....just to feel...uun paus...
hey mala vatatay after reading ur post mi pan lihayala vagere lagaley.....:-)
Baryach divsani itka askhalit marathitla lekh vachayala milala.
Kharokharach khup chan lekh ahe. Ashish chi vichar mandanyachi padhdhat atyant surekh ahe.
Waiting for the next Marathi Blog!
Nice correlation between paus ani jivlag vyakti...Nice snap too... keep writing Marathi blogs.. good one :)
Good one Ashish! Surfing from office so cannot see the picture you have uploaded. Knowing your photography skills, am sure even that will be worth a dekho!
Post a Comment