Friday, December 23, 2011

तुझी आठवण येते

रण रणत्या उन्हांत..... जेव्हा वार्याची झुळूक सुखावते..
तेव्हा तुझी आठवण का येते???

मुसळधार पावसात छत्री स्वतःला ओलं करून मला वाचवते...
तेव्हा तुझी आठवण का येते???

गुलाबी थंडीत कोणी उबदार रजई ओढवली की.....
तुझ्या मिठीची आठवण का येते.....

डोळ्यातील अश्रूंचा पारा फुटला की.....
तुझ्या पदराची आठवण का येते...

उम्म्लेली टवटवीत फुले बघून...
तुझ्या हसण्याची आठवण का येते.....

कोमेजलेल्या कळ्या बघून....
तुझ्या आसवांची आठवण कशी काय येते........

रोजच्या जगण्यात काही तरी चुकतं आहे कळ्यावर....
तुझ्या उणीवीची जाणीव कशी काय होते??????

नेहमी बरोबर तुझीच आठवण कशी काय येते....
नेहमी बरोबर तुझीच आठवण कशी काय येते....


4 comments:

Sandy said...

lai zakkas!

Ashok said...

Mastach!!! bus miss kelyacha kevhdha motha fayada :)

Suvarna said...

khupach chaan aahe.

Unknown said...

apratim kavita....well done Ashish